निकालांनी अपेक्षाभंग केला, तर INDI आघाडीची उद्याच पत्रकार परिषद, निवडणूक आयोगाविरोधात निदर्शने!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल आपल्या अपेक्षेबरहुकूम आले नाही तर, INDI आघाडी उद्याच निदर्शनांचा धडाका उडवून देणार आहे. काँग्रेसने पुढाकार घेऊन राजधानी दिल्लीत मध्ये घेतलेल्या INDI आघाडीच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, तो म्हणजे आघाडीच्या सगळ्या नेत्यांना दिल्लीतच थांबण्याचे निर्देश देण्यात आले.INDI alliance will hold a press conference tomorrow, protests against the Election Commission!!

उद्या दुपारपर्यंत लोकसभा निवडणुकीचे निकाल येतील. त्यावेळी INDI आघाडीचा आकडा जमला तर ठीकच, पण तो जमला नाही, तर निदर्शने करण्याचा इरादा नेत्यांनी व्यक्त केला आहे. इतकेच नाही, तर INDI आघाडीच्या सगळ्याच नेत्यांची तातडीची बैठक घेऊन त्यामध्ये पुढच्या रणनीतीची देखील चर्चा करण्याचा काँग्रेसचा इरादा आहे.



या रणनीतीमध्ये लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण निवडणूक निकाल नाकारून त्या निकाला विरोधात राष्ट्रपतींना भेटणे, संपूर्ण देशभर निदर्शनांचे नियोजन करणे, निवडणूक आयोगाविरुद्ध गदारोळ माजविणे त्याचवेळी निकाला विरोधामध्ये दाद मागण्यासाठी कायदेशीर ऑप्शनची चर्चा करणे या सगळ्या बाबींचा समावेश आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत INDI आघाडी पासून विशिष्ट अंतर राखून असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उद्याच्या बैठकीसंदर्भात अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्या उद्या सकाळी किंवा दुपारी दिल्लीत दाखल होऊन INDI आघाडीच्या नेत्यांना भेटतील आणि नंतरच्या बैठकीत देखील सामील होतील, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे.

काँग्रेसने एक्झिट पोलचे निष्कर्ष मान्य केले नाहीतच. त्यासाठी त्यांनी वेगवेगळे तर्क दिले. एक्झिट पोलच्या निष्कर्षाआधी तासभर INDI आघाडीचा 295 हा आकडा जाहीर केला. याआधी संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस किंवा INDI आघाडीने आपला बहुमताचा कुठला आकडा जाहीर केलेला नव्हता. पण एक्झिट पोलचे निष्कर्ष येण्यापूर्वी तासभर 295 हा आकडा त्यांनी जाहीर केला.

आता तो आकडा प्रत्यक्ष निकालत प्रतिबिंबित झाला नाही, तर संपूर्ण निवडणूक निकालाच्याच विरोधात संपूर्ण देशभर गदारोळ माजवायचा. त्यासाठी सरकार, निवडणूक आयोग यांच्यावर सगळीकडून फायरिंग करायचे हा INDI आघाडीचा इरादा असल्याचे सोशल मीडियावर फिरत होतेच, प्रत्यक्षात काँग्रेस सूत्रांकडून देखील आज रणनीतीच्या नावाखाली त्या गदारोळाला दुजोरा मिळाला.

INDI alliance will hold a press conference tomorrow, protests against the Election Commission!!

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात