विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सेमी फायनल मध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाल्यानंतर पुढे ढकललेली INDI आघाडीची आज बैठक होत आहे, पण त्यापूर्वीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला बंगालमध्ये फक्त 2 जागा देण्याची तयारी दाखवली असून महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाने काँग्रेसला युतीधर्म शिकून घेण्याची शिकवणी दिली आहे. या पार्श्वभूमीवर INDI आघाडीची बैठक होत आहे.INDI Alliance meeting today; Mamata ready to give 2 seats to Congress in Bengal; Thackeray group’s teaching of alliance to Congress!!
INDI आघाडीच्या आजच्या लोकसभेच्या जागा वाटपाची चर्चा प्रामुख्याने होण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर INDIइंडिया आघाडीचा लोगो तसेच झेंडा फायनल होण्याची देखील अपेक्षा आहे पण जागा वाटपाचे घोडे काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिकांवर आडू शकण्याची चिन्हे आहेत कारण कालच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मामाचा बॅनर्जी यांनी बंगालमध्ये काँग्रेसची आघाडी करण्याबाबत आमची तयारी आहे पण राज्यात काँग्रेस पडेल फक्त दोनच खासदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावे पण आम्ही खुल्या मनाने त्यांच्याशी चर्चा करू असे वक्तव्य केले यातून मामाचा बॅनर्जींनी काँग्रेसला त्यांच्या ताकदीची मर्यादाच जाणवून दिली.
पण यापेक्षाही एक महत्त्वपूर्ण बाब अशी की, आजच्या INDI आघाडीच्या बैठकीपूर्वी ममता बॅनर्जी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. ममता बॅनर्जींच्या कार्यालयानेच ही भेट होणार असल्याचे कन्फर्म केले आहे या भेटीची कारण पश्चिम बंगाल मधल्या समस्या आणि आर्थिक मदत हे सांगितले असले तरी, पंतप्रधानांबरोबरची ममतांची बैठक राजकीय टाइमिंग साधून INDIA आघाडीच्या बैठकीपूर्वी होत आहे. यात बरेच काही “बिटवीन द लाईन्स” दडले असल्याची चर्चा आहे.
ममतांनी अशा प्रकारे काँग्रेसची कोंडी केली असताना दुसरीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सामना या मुखपत्रातून काँग्रेसला युती धर्माची शिकवणी दिली आहे. काँग्रेसने नव्या परिस्थितीत युतीधर्म शिकून घ्यावा. मोठे काही मिळवायचे असेल, तर छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो, हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घ्यावे, असा उपदेश ठाकरे गटाने सामनातून केला आहे.
INDI आघाडीच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी हे सगळे घडत असल्याने या बैठकीच्या यशस्वी ते विषयी ठळक प्रश्नचिन्ह लागले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App