ऑनलाईन पोर्टल न्यूज लॉँड्री आणि न्यूज क्लिकच्या कार्यालयांवर प्राप्तीकर विभागाचे छापे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: ऑनलाइन पोर्टल ‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ च्या कार्यालयांवर शुक्रवारी प्राप्तीकर विभागाने छापे घातले. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर ईडीने ‘न्यूज क्लिक’ वेबसाइट आणि तिच्या संस्थापकांवर मनी लाँड्रींग प्रकरणी छापा मारला होता.Income tax department raids the offices of online portal News Laundry and News Click

२०१८ मध्ये अमेरिकेची कंपनी वर्ल्डवाइड मीडिया होल्डिंग्सकडून ९.९५ कोटी रुपए प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक मिळवल्याचा आरोप आहे. त्यावेळी ईडीने न्यूज क्लिकचे मुख्य संपादक प्रबीर यांच्या घरी छापा टाकला होता.प्राप्तीकर विभागाने कर चोरी प्रकरणी तपासणीची कारवाई केली होती. प्राप्तीकर विभागाने अधिकृतपणे याला दुजोरा दिला आहे. प्राप्तीकर विभागाची पथकं दोन्ही वेबसाइटच्या ऑ फिसमध्ये गेली होती. पण ही कारवाई छापा नसून ‘सर्वे’ असल्याचं प्राप्तीकर विभागाने म्हटले आहे.

‘न्यूज लाँड्री’ आणि ‘न्यूज क्लिक’ च्या कार्यालयांमध्ये विभागाची पथकं तपासणी करत आहेत, असे प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दोन्ही वेबसाइटसंबंधी खात्यांची तपासणी केली जात आहे. दोन्ही संस्थांचा कर परतावा आणि इतर देणींची तपासणी करण्यासाठी प्राप्तीकर विभागाची पथके गेली होती.

‘न्यूज लाँड्री’ने प्राप्तीकर विभागाच्या कारवाईवर आतापर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता प्राप्तीकर विभागाचे कर्मचारी आले होते. ऑफिसमध्ये काम करणाºयाा ४ ते ५ कर्मचाऱ्यांचे मोबाइल आणि लॅपटॉपही घेऊन घेले. या कर्मचाऱ्यांना बाहेर कुणाशी बोलण्यापासून रोखण्यात आले होते.

Income tax department raids the offices of online portal News Laundry and News Click

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात