उत्तर प्रदेशात एनीसीसी छात्रांची संख्या होणार दुप्पट, संरक्षण मंत्रालयाकडून खासगी शाळांनाही कोर्स सुरू करण्यास परवानगी

उत्तर प्रदेशात एनीसीसी छात्रांची संख्या होणार दुप्पट, संरक्षण मंत्रालयाकडून खासगी शाळांनाही कोसैन्यदलाचे प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) विद्यार्थ्यांची संख्या आता उत्तर प्रदेशात वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाने आता उत्तर प्रदेशातील खासगी शाळांनाही एनसीसीचे कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे.


प्रतिनिधी

लखनऊ : सैन्यदलाचे प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) विद्यार्थ्यांची संख्या आता उत्तर प्रदेशात वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाने आता उत्तर प्रदेशातील खासगी शाळांनाही एनसीसीचे कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे. In Uttar Pradesh, the number of ANCC students will double, with the Ministry of Defense allowing private schools to start courses

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या या निर्णयामुळे एनसीसीच्या विद्यार्थ्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. खासगी शाळांना यासाठी अनुदान मिळणार नाही. मात्र, या शाळा चार हजार विद्यार्थ्यांची ज्युनिअर डिव्हीजन तयार करता येणार आहे.



सध्या उत्तर प्रदेशात दीड लाख एनसीसीचे छात्र आहेत. संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिल्याने ही संख्या दुप्पट होणार आहे. केंद्राच्या या पावलामुळे एनसीसीचे काम वाढणार आहे.
उत्तर प्रदेश एनसीसी संचालनालयाचे अप्पर महासंचालक मेजर जनरल राकेश राणा यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात जागा कमी असल्याने एनसीसीचा कोर्स सुरू करता येत नव्हता. अनेक शाळा एनसीसी सुरू करण्यासाठी परवानगी मागत होत्या.

एनसीसीचे विद्यार्थी राष्ट्रउभारणीत महत्वाची भूमिका बजावतात. शाळेतील विद्यार्थ्यांना एसीसीचे ए प्रमाणपत्र मिळण्याबरोबरच महाविद्यालयांत प्रवेश मिळणेही सुकर होणार आहे. कर्नल ए. के. सिंह यांनी सांगितले की, शासकीय शाळांमध्ये चालविल्या जाणाऱ्या एनसीसीचा खर्च एनसीसी संचालनालयाकडून केला जातो. मात्र, खासगी शाळांना स्वत: हा खर्च करावा लागेल. इच्छुक शाळांना आपल्या शाळेत एनसीसी सुरू करायची असेल तर आपल्या शिक्षकांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. र्स सुरू करण्यास परवानगी सैन्यदलाचे प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) विद्यार्थ्यांची संख्या आता उत्तर प्रदेशात वाढणार आहे. संरक्षण मंत्रालयाने आता उत्तर प्रदेशातील खासगी शाळांनाही एनसीसीचे कोर्स सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

In Uttar Pradesh, the number of ANCC students will double, with the Ministry of Defense allowing private schools to start courses

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात