उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा बाजी मारणार, काँग्रेस होणार भुईसपाट; भाजपला २२५-२३७ जागा तर सपाला १३९-१५१ जागा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा बाजी मारणार असल्याचे निवडणूकपूर्व सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. उत्तर प्रदेशात खरा सामन सपा-भाजपतच रंगणार असून काँग्रेस भुईसपाट होणार आहे, असे अंदाजात म्हंटले आहे. एकूण ४०३ जागांसाठी सात टप्प्यात मतदान होणार आहे.In Uttar Pradesh, BJP will win again, Congress will be level; BJP has 225-237 seats and SP has 139-151 seats

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले आहेत.मतदानापूर्वी झालेल्या शेवटच्या ओपिनियन पोलच्या निकालावरून मुख्य लढत भाजप आणि सपा यांच्यात आहे. भाजपला २२५-२३७ जागा तर सपाला १३९-१५१ जागा मिळू शकतात.



 

बसपाला १३-२१ जागा आणि काँग्रेसला ४-८ आणि इतरांना २-६ जागा मिळू शकतील, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.पश्चिम उत्तर प्रदेशातील १३६ जागांपैकी भाजप ७१-७५ जागा, तर सपा ५०-५४ जागा जिंकू शकतो.

बसपाला ८-१० जागा मिळू शकतील, तर काँग्रेसला १-३ जागा मिळतील. इतरांना ०-१ जागा मिळतील, असा अंदाज आहे.उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. नंतर १४, २०,२३, २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च, ७ मार्च असं सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

In Uttar Pradesh, BJP will win again, Congress will be level; BJP has 225-237 seats and SP has 139-151 seats

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात