न्यूड कॉल करून चक्क भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ब्लॅकमेलचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : देशात सध्या सक्सटॉर्शन म्हणजे न्यूड कॉल करून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार वाढले आहेत. चक्क भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना न्यूड कॉल करून एका तरुणीने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.Attempt to blackmail BJP MP Pragya Singh Thakur by making nude calls

भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी रात्री एका तरुणीचा व्हिडीओ कॉल आला होता. त्या व्हिडीओ कॉलमध्ये संबंधित तरुणी ही नग्नावस्थेत दिसत होती. त्यानंतर प्रज्ञा यांना अज्ञात मोबाईल क्रमांकांवरून अश्लील फोटो आणि मेसेजेसही पाठवण्यात आले. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी त्या दोन्ही फोन नंबरविरोधात एफआयआर दाखल करत तपास सुरु केला आहे.याप्रकरणी खासदार प्रज्ञा सिंह यांनी शहरातील टीटी नगर पोलीस ठाण्यात रात्री दोन वाजता तक्रार केली. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. तक्रारीनुसार खासदारांना आधी अश्लील फोटो पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर सेलची देखील मदत घेतली जात आहे. आरोपींना लवकरच पकडलं जाईल, असे सांगण्यात आले आहे.

साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास एका मुलीचा व्हिडीओ कॉल आला होता. कॉल उचलल्यानंतर या मुलीने अंगावरील कपडे काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रज्ञा यांनी तातडीने फोन ठेवला. त्यानंतर लगेच दुसऱ्या एका मोबाईल नंबरवरुन त्याच मुलीचा व्हिडीओ पाठविण्यात आला.

यावेळी संबंधित तरुणीने प्रज्ञा साध्वी यांच्यासोबतचा तो व्हिडीओ कॉल सोशल मीडिआवर शेअर करण्याची धमकी दिली. जर आपण सांगितलेलं प्रज्ञा यांनी केलं नाही तर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करु,

अशाप्रकारे त्यांना ब्लॅकमेल करण्यात आले. यानंतर लगेचच साध्वी प्रज्ञा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी कलम ३५४,५०७ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Attempt to blackmail BJP MP Pragya Singh Thakur by making nude calls

महत्त्वाच्या बातम्या