राहूल गांधींची गरीबीची नवी व्याख्या, १० कोटी रुपयांवर संपत्ती असलेला गरीबाचा मुलगा


विशेष प्रतिनिधी

अमृतसर : कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी यांनी गरीबीची नवी व्याख्या केली आहे. सुमारे दहा कोटी संपत्ती असलेल्याला त्यांनी गरीबाचा मुलगा म्हटले आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केली.Rahul Gandhi’s new definition of poverty, the son of a poor man with a fortune of Rs 10 crore

यावेळी त्यांनी चन्नी गरीबाचा मुलगा असल्याचं म्हटले. मात्र या गरीबाच्या मुलाकडे सुमारे दहा कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनीच निवडणूक आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.निवडणुकीत घोषित केलेल्या संपत्तीनुसार चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे ९ कोटी ४५ लाख रुपयांची संपत्ती आहे.



विशेष म्हणजे २०१७ च्या तुलनेत २०२२ मध्ये चन्नी यांची संपत्ती कमी झालेली दिसली. २०१७ मध्ये चरणजीत सिंग यांच्याकडे १४ कोटी ५१ लाख रुपयांची संपत्ती होती.चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे २ कोटी ६२ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तसेच ६ कोटी ८२ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

चन्नी यांच्याकडे १ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम, तर त्यांची पत्नी डॉ. कमलजीत कौर यांच्याकडे ५० हजार रुपये रोख रक्कम आहे. चन्नी यांच्या बँक खात्यात ७८ लाख ४९ हजार रुपये, तर पत्नीच्या बँक खात्यात १२ लाख ७६ हजार रुपये आहेत. चन्नी यांच्याकडे ३२ लाख ५७ हजार रुपयांची टोयोटो फॉर्च्युनर कार आहे. चन्नी यांच्या पत्नीकडे २ कार आहेत. एकीची किंमत १५ लाख ७८ हजार रुपये, तर दुसरीची किंमत ३० लाख २१ हजार रुपये आहे.

तर चन्नी यांच्याकडे १० लाख रुपयांचे, तर पत्नीकडे ५४ लाख रुपयांचे दागिणे आहेत. २६ लाख ६७ हजार रुपये एका पेट्रोल पंपात गुंतवणूक आणि कृषी आणि बिगर कृषी अशा दोन्ही प्रकराची जमीन, अनेक बंगले आहेत.

राहुल गांधी म्हणाले होते की, पंजाब हिंदुस्तानच्या लोकांची सुरक्षा ढाल आहे. या राज्याला आपला नेता स्वत: निवडायला हवा आणि माझं काम तुमचा आवाज ऐकणं आहे, समजून घेणं आहे. माझ्या मतापेक्षा पंजाबच्या जनतेचं मत अधिक महत्त्वाचं आहे. पंजाबच्या जनतेने त्यांना एका गरीब घरातील मुख्यमंत्री हवा असं सांगितलं, जो गरीबी, भूक, त्यांची भीती समजू शकेल. पंजाबला त्या व्यक्तीची गरज आहे.

Rahul Gandhi’s new definition of poverty, the son of a poor man with a fortune of Rs 10 crore

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात