विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गरीब आणि सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. 2021च्या आकडेवारीनुसार, भारतातल्या एक टक्का लोकसंख्येकडे राष्ट्रीय उत्पन्नातला 22 टक्के वाटा आहे. त्यातला केवळ 13 टक्के हिस्सा तळागाळातल्या 50 टक्के समाजाकडे आहे.In the list of countries with the highest inequality and poverty, India, with only one per cent, contributes 22 per cent to the national income.
जागतिक असमानता अहवाल 2022 नुकतच प्रसिद्ध झाला असून, त्यात हे निरीक्षण मांडण्यात आलं आहे. वर्ल्ड इनइक्वॅलिटी लॅबचे सहसंचालक लुकास चान्सल यांनी हा अहवाल तयार केला आहे.फ्रान्स येथील अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेट्टी यांच्यासह अनेक तज्ज्ञांच्य सहयोगाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
या अहवालननुसार भारताचा समावेश जगातल्या सर्वांत जास्त असमानता असलेल्या देशांच्या यादीत झाला आहे. भारतातल्या प्रौढ लोकसंख्येचे सरासरी वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न 2,04,200 रुपये आहे.तळागळातल्या म्हणजेच जवळपास 50 टक्के लोकसंख्येचं सरासरी उत्पन्न 53,610 रुपये आहे.
समाजातल्या सर्वांत वरच्या 10 टक्के लोकसंख्येचं उत्पन्न यापेक्षा सुमारे 20 पट जास्त म्हणजेच 11,66,520 रुपये एवढं आहे, असे या अहवालात म्हटले आहे.राष्ट्रीय उत्पन्नातला 57 टक्के भाग भारतातल्या सर्वांत वरच्या 10 टक्के लोकसंख्येकडे म्हणजेच श्रीमंतांकडे एकवटला आहे.
सर्वांत वरच्या एक टक्का लोकसंख्येच्या म्हणजेच अतिश्रीमंतांच्या हातात राष्ट्रीय उत्पन्नातला 22 टक्के भाग आहे. सर्वांत खालच्या 50 टक्के लोकसंख्येकडे मात्र राष्ट्रीय उत्पन्नातला केवळ 13 टक्के हिस्सा आहे. भारतात सरासरी कौटुंबिक उत्पन्न 9,83,010 रुपये आहे. या अहवालात म्हटलं आहे, की भारत हा एक गरीब आणि खूप असमानता असलेला देश आहे. या देशात उच्चभ्रू लोकसंख्या मोठी आहे.
भारतात लैंगिक असमानताही खूप असल्याचे या अहवालात म्हटलं आहे. एकूण उत्पन्नात महिला कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नाचा वाटा 18 टक्के आहे. चीन वगळता आशियाची या बाबतीतली सरासरी 21 टक्के आहे. जागतिक पातळीचा विचार करायचा झाल्यास, जगातल्या सर्वांत श्रीमंत असलेल्या 10 टक्के लोकसंख्येकडे जागतिक संपत्तीतला 76 टक्के हिस्सा आहे. जगातल्या निम्म्या म्हणजेच गरीब लोकसंख्येकडे मात्र केवळ 2 टक्के संपत्ती आहे. युरोपात अशी असमानता सर्वांत कमी आहे, असं या अहवालात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App