महत्त्वाची बातमी : सरकारने बॅन केल्या पासपोर्ट बनवणाऱ्या सहा बनावट वेबसाइट!


बातमीमध्ये पहा बॅन केलेल्या बनावट वेबसाइटची यादी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  भारत सरकारने पासपोर्ट सेवा देण्याचा दावा करणाऱ्या बनावट वेबसाइट आणि अप्स बाबत अलर्ट जारी केला आहे. जेव्हा तुम्ही पासपोर्ट वेबसाइट www.passportindia.gov.in उघडतात, तेव्हा ही बनावट साइट त्वरीत फ्लॅश होते. यामुळे पासपोर्टसाठी अर्ज करणारे अनेकजण या जाळ्यात अडकतात. Important news Six fake passport making websites banned by the government

ही वेबसाइट आणि अप्स ऑनलाइन अर्ज भरणे, अपॉइंटमेंट शेड्यूल करणे आणि अनेक सेवा देतात. मंत्रालयास समजले आहे की, अनेक बनावट वेबसाइट आणि मोबाइल अप्स अर्जदारांचा डेटा गोळा करत आहेत. त्यामुळे सर्वांना सूचित केले जात आहे की, बनावट वेबसाइटपासून जपून राहा. याशिवाय तुमच्या पासपोर्ट अर्जाची सद्यस्थित तपासण्यासाठी कुठलेही दुसरे अप नाही.

पासपोर्टसाठी अर्ज करण्यास www.passportindia.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे. मंत्रालयाने आपल्या वेबसाइटवर स्पष्टपणे सांगितले आहे की, ही देशभरात अर्जदारांसाठी पासपोर्टसंबंधी सर्व आवश्यकता पूर्ण करणारे एकमेव अधिकृत पोर्टल आहे.

बनावट वेबसाइटची नावे  –

1)www.indiapassport.org

2)www.Online-passportindia.com

3)www.passportindiaportal.in

4)www.passport-india.in

5)www.passport-seva.in

6)www.applaypassport.org

परराष्ट्र मंत्रालय (MEA) देशातील 36 पासपोर्ट कार्यालये आणि परदेशात स्थित 190 भारतीय मिशन आणि पोस्ट असलेल्या एका व्यापक नेटवर्कद्वारे भारतीय नागरिकांना पासपोर्ट जारी करण्याची जबाबदारी घेते.

Important news Six fake passport making websites banned by the government

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात