अमर जवान ज्योती मालविणार नाही, तर राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीत विलीन करणार!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीतील सुप्रसिद्ध अमर जवान ज्योती उद्या समारंभपूर्वक राष्ट्रीय युद्ध स्मारक ज्योती मध्ये विलीन करण्यात येणार आहे. हा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आज संयुक्त संरक्षण दलाचे प्रमुख एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ हा समारंभ होणार आहे. Immortal Jawan will not extinguish the light, but will merge in the light of National War Memorial !!

अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योती मध्ये विलीन झाल्यानंतर मूळ अमर जवान ज्योती मालविण्यात येणार नाही. अमर जवान ज्योती स्मारक ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधले आहे. त्यानंतर त्यामध्ये काही वेळा भर पडली. 1971 च्या युद्धानंतर काही नावे या स्मारकात घातली गेली. परंतु हे स्मारक ब्रिटिशांनी बांधले असल्याने स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने 2014मध्ये घेतला. त्यानंतर दोन वर्षात राष्ट्रीय युद्ध स्मारक बांधून पूर्ण करण्यात आले. या स्मारकात स्वातंत्र्यानंतर झालेल्या युद्धांमुळे शहीद झालेल्या सर्व जवानांची नावे कोरली आहेत. त्यामुळेच अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योती विलीन करण्यात येणार आहे.

इंडिया गेट ब्रिटिशांनी बांधले आहे मात्र राष्ट्रीय युद्ध स्मारक 1947 पासून आजपर्यंत एवढी युद्ध झाली त्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांचे स्मारक आहे त्यामुळे इंडिया गेट मध्ये असलेल्या अमर जवान ज्योती चे विलीनीकरण राष्ट्रीय युद्ध स्मारक आमच्या ज्योती मध्ये करणे हा उचित सन्मान आहे असे प्रजासत्ताक दिनाचे तब्बल 49 वर्षांचे दूरदर्शन समालोचक ब्रिगेडियर चित्तरंजन सावंत यांनी म्हटले आहे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मताला सहमती दर्शवली आहे.

Immortal Jawan will not extinguish the light, but will merge in the light of National War Memorial !!

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात