विशेष प्रतिनिधी
जिनेव्हा : ख्रिश्चनफोबिया, इस्लामोफोबियाप्रमाणे हिंदू, बौध्द आणि शिखफोबियामुळे निर्माण झालेल्या उन्मादाकडेही जगाने गंभीरपणे पाहावे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्रसंघात भारताच्या वतीने मांडण्यात आली.Take seriously the anti-Hindu phobia, India’s role in the UN without naming Pakistan
जागतिक दहशतवादी विरोधी समितीच्या (ग्लोबल काउंटर टेररिझम कौन्सिल) परिषदेत बोलताना संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती पाकिस्तानचे नाव न घेता म्हणाले, गेल्या दोन वर्षांत अनेक सदस्य राष्ट्रे त्यांच्या राजकीय धार्मिक आणि इतर प्रेरणांनी प्रेरित झाले आहेत. वांशिक आणि वांशिकदृष्ट्या प्रेरित हिंसक राष्ट्रवाद आणि उजव्या विचारसरणीचा अतिरेक सुरू आहे.
त्याला दहशतवादच म्हणायला हवे. ही धोकादायक प्रवृत्ती असून जागतिक दहशतवाद विरोधी धोरणात सर्व सदस्य राष्ट्रांनी मान्य केलेल्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. दहशतवाद कोणत्याही स्वरुपाचा असो त्याचा निषेधच केला पाहिजे. दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याचे समर्थन करणे योग्य नाही.
आमचे दहशतवादी आणि तुमचे दहशतवादी अशी लेबले लावणेच चुकीचे आहे. ते आपल्याला9/11 पूर्वीच्या युगात घेऊन जातील. त्यामुळे गेल्या दोन दशकांत सामूहिक पातळीवर आपण केलेले प्रयत्न वाया जातील.
जगातील इतर प्रमुख धर्मांविरुद्ध नवीन फोबिया किंवा द्वेष निर्माण होत असेल तर तो पूर्णपणे ओळखला पाहिजे. विशेषत: हिंदूविरोधी, बौद्धविरोधी आणि शीखविरोधी फोबिया ही गंभीर चिंतेची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App