Pune : मेट्रोकडून पुणेकरांसाठी उपलब्ध करण्यात आल्या ई-सायकली


 

दरम्यान ॲपद्वारे या सायकली ऑपरेट होत असून, त्यांना प्रति तास पाच रुपये भाडे आहे. तसेच नागरिकांना याचा साप्ताहिक, मासिक किंवा दीर्घकालीन पास देखील काढता येऊ शकतो.Pune: Metro provides e-bicycles for Pune residents


विशेष प्रतिनिधी

पुणे : पुण्यातील मेट्रो लवकरच पुणेकरांच्या सेवेसाठी येणार आहे. तसेच विशेष म्हणजे मेट्रो कडून पुणेकरांना भाडे तत्वावर ई- सायकली मिळणार आहेत.पब्लिक रिलेशन डिपार्टमेंट जनरल मॅनेजर हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, गरवारे मेट्रो स्टेशन जवळ हे सायकल स्टँड असून, सध्या येथे दहा सायकल उपलब्ध आहेत.

पुढे सोनवणे म्हणले की , तसेच या सायकलींचे क्यू आर कोड द्वारे लॉक उघडता येते. जेव्हा आपण ॲपद्वारे सायकलचे भाडे भरतो तेव्हा हे लॉक उघडते. मग आपण ही सायकल आपण वापरू शकतो.या सायकली युनो बाईक आणि माय बाईक या दोन कंपन्यांच्या आहेत.’

दरम्यान ॲपद्वारे या सायकली ऑपरेट होत असून, त्यांना प्रति तास पाच रुपये भाडे आहे. तसेच नागरिकांना याचा साप्ताहिक, मासिक किंवा दीर्घकालीन पास देखील काढता येऊ शकतो. या सायकलींचा मेंटेनन्स खर्च सदर दोन्ही कंपन्या करणार आहेत. कंट्रोल सेंटरमध्ये सायकल कोठे आहे कोणती सायकल खराब झाली आहे याची माहिती मिळते,अस देखील सोनवणे म्हणाले.

Pune: Metro provides e-bicycles for Pune residents

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात