मागील काही दिवसांपासून मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली मेट्रोसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रकार सुरू आहे. आयआयटी दिल्लीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी ब्लू लाईन मेट्रोच्या टिळक नगर स्थानकावर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. घटनेनंतर लगेचच जखमी विद्यार्थ्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. IIT Delhi student attempts suicide at metro station
मेट्रोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आयआयटी दिल्लीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने रविवारी दिल्ली मेट्रो ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. आयआयटी-डीचा विद्यार्थी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर उभा होता. द्वारकेला जाणारी ट्रेन स्टेशनवर थांबणार असतानाच त्याने समोर उडी मारली. मात्र चालकाने इमर्जन्सी ब्रेक लावल्याने अनर्थ टळला.
संबधित विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यावेळी विद्यार्थ्याने मेट्रोसमोर उडी मारली, त्यावेळी मेट्रोचा वेग खूपच कमी होता आणि चालकाने संधी न दवडता आपत्कालीन ब्रेक लावला, ज्यामुळे त्याचा जीव वाचला.
मेट्रोच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या प्रयत्नात जखमी झालेला विद्यार्थी हा दक्षिण भारतातील तामिळनाडू राज्यातील रहिवासी आहे. तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून बी.टेक पदवी घेत आहे. दिल्ली मेट्रो ही राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी जीवनवाहिनी आहे, परंतु गेल्या काही काळापासून ही मेट्रो चर्चेत आली ती अनेकांच्या आत्महत्यांच्या घटनांमुळे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मेट्रोने बहुतांश स्थानकांवर हिरवे दरवाजे लावले असले तरी नागरिकांनी मेट्रोतून उड्या मारण्याच्या घटना थांबत नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App