जुगाड : वाह क्या बात है ! रुग्णांना वाचवण्यासाठी ‘देशी रुग्णवाहिका’ ; IPS अधिकारी रूपिन शर्मा यांनी शेअर केला व्हिडीओ

  • सध्या अशाच एका जुगाडाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या जुगाडाकडे पाहून अनेकांनी ठोकला सलाम!Idea :  Odisha homemade Ambulance video goes viral on social media

  • शोले मध्ये दोन मित्र जय विरू जशी गाडी वापरतात तशीच गाडी रूग्णांना वाचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: भारत आणि जुगाड हे फार जवळचं नातं आहे असं म्हणतात की आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कधी कोण कशाचं जुगाड करेल हे सांगता येत नाही. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचे अविष्कार अनेकजण करतात. सध्या अशाच एका जुगाडाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या देशी जुगाडाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.IPS अधिकारी रूपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ  शेअर केला आणि त्यानंतर तो तुफान चर्चेत आला .. Idea :  Odisha homemade Ambulance video goes viral on social media

ओडिशातील अशाच एका बुद्धीवंताने एक मस्त देशी रुग्णवाहिका तयार केली आहे. या रुग्णवाहिकेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.

ओडिशामध्ये दुचाकीच्या मदतीने एका रुग्णवाहिकेची निर्मिती करण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये एका वेळेला एका रुग्णाची ने-आन केली जाऊ शकते. ज्या भागामध्ये रस्ते तसेच दळणवळणाच्या अडचणी आहेत, त्या भगात अशा प्रकारच्या रुग्णवाहिका संजीवनी ठरु शकतात. या रुग्णवाहिकेत एका रुग्णाला झोपता येईल अशा प्रकारे लोखंडी चौकोनी डब्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हा चौकोनी डबा दुचाकीला जोडण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एका महिला रुग्णाला रुग्णालयात नेले जात असल्याचे दिसत आहे . एवढंच नाही तर रुग्णवाहिकेवर अॅम्ब्यूलन्स असे लाल रंगात लिहलेलेसुद्धा दिसत आहे . तसेच रहदारीतून वाट काढण्यासाठी सायरनसुद्धा बसवण्यात आले आहे.

Idea :  Odisha homemade Ambulance video goes viral on social media

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात