Cyclone Yaas West Bengal : यासचे तांडव ;३ लाख घरांचं नुकसान ; हल्दिया येथे पूल कोसळला


  • यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत.

  • सैन्य-नेव्ही बचाव आणि मदत करण्यासाठी किनारपट्टी भागात तैनात आहेत.

  • बंगळूर-ओडिशा गाड्या रद्द, कोलकाता विमानतळ बंद.Cyclone Yaas West Bengal ; 3 lakh houses damaged; The bridge collapsed at Haldia

वृत्तसंस्था

कोलकाता: यास चक्रीवादळामुळं पश्चिम बंगालमध्ये किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून त्यामध्ये लोकांच्या कार बुडताना दिसत आहेत. सध्या किनारपट्टीच्या भागात जवळपास १८० किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत.

दक्षिण २४ परगण्यातही लोकांच्या मदतीसाठी आणलेला एक जेसीबी पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली. ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून झारखंडमध्ये वादळ उद्या पोहोचेल असा अंदाज आहे. Cyclone Yaas West Bengal ; 3 lakh houses damaged; The bridge collapsed at Haldia

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा दक्षता समित्या आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यास चक्रीवादळामुळे राज्यातील तीन लाख घरांचं नुकसान झाल्याची माहिती दिली. याशिवाय 15 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं देखली त्यांनी सांगितलं आहे.

Cyclone Yaas West Bengal; 3 lakh houses damaged; The bridge collapsed at Haldia

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात