I.N.D.I.A. आघाडीतल्या तिसऱ्या बैठकीतल्या ठरावात हीच भाषा; “शक्यतोवर” लोकसभा निवडणुका एकत्र लढवू!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : I.N.D.I.A आघाडीची मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये तिसरी बैठक झाली. काल मराठी पक्वानांवर ताव मारून झाला, पण इंडिया आघाडीच्या लोगोच्या अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागला.I.N.D.I.A. says will contest loksabha together elections as far as possible!!

या बैठकीत काही ठराव जरूर झाले, पण आपण इंडिया आघाडीतले सर्व घटक पक्ष “शक्यतोवर” एकत्र येऊन लोकसभेची निवडणूक लढवू, अशा भाषेत ठराव संमत करण्यात आला. इथेच “इंडिया” आघाडीच्या एकजुटीची खरी “राजकीय मेख” दडली आहे!!



“इंडिया” आघाडीच्या बैठकीत काही ठराव संमत करण्यात आले. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचा ठराव लोकसभा निवडणूक एकत्र येऊन लढण्याचा आहे. पण या ठरावाची भाषा अत्यंत तोलून मापून आणि जपून वापरली आहे. शक्यतोवर आपण ही लोकसभा निवडणूक एकत्र लढवू. जागा वाटपाचा निर्णय लवकरात लवकर घेऊ आणि त्यामध्ये देवाणघेवाणीचे सूत्र वापरू, असे या ठरावात नमूद केले आहे. पण यातला “शक्यतोवर” हा शब्द सर्वांत कळीचा आहे.

मूळात “इंडिया” आघाडीची मुंबईत तिसरी बैठक झाली. या आधीच्या दोन बैठका पाटणा आणि बंगलोर इथे पार पडल्या होत्या. त्या दोन्ही बैठकांमध्ये असले कुठलेही ठराव संमत झाल्याच्या बातम्या आल्या नव्हत्या. ठराव संमत झाल्याच्या बातम्या मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमधून आल्या. पण त्यातलीही भाषा “शक्यतोवर” म्हणजेच “ऍज फॉर ऍज पॉसिबल” अशी वापरण्यात आली. यातूनच “इंडिया” आघाडीतली एकजूट किती तकलादू आहे हे दिसले!!

I.N.D.I.A. says will contest loksabha together elections as far as possible!!

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात विठ्ठल रखुमाईला शोभुनी दिसतो तिरंगा!