काल केले भोजन, आज पुढे ढकलले लोगोचे अनावरण; याला म्हणतात “इंडिया” आघाडीचे “नियोजन”!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ग्रँड हयात मध्ये काल रात्री केले भोजन, पण आज ढकलले लोगोचे अनावरण; याला म्हणतात “इंडिया” आघाडीचे “नियोजन” असे खरंच आज 1 सप्टेंबर रोजी घडले आहे.I.N.D.I.A. leaders failed to decide on the logo of alliance itself and they claim to fight with Modi!!

“इंडिया” आघाडीच्या सर्व नेत्यांनी काल रात्री ग्रँड हयात हॉटेलमध्ये वडापाव पासून पुरणपोळीपर्यंतच्या मराठी भोजनावर ताव मारला. तो ताव मारतानाच भरपूर गप्पा मारल्या. उद्या “इंडिया” आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार, असे ढोल वाजविले. पण आज 1 सप्टेंबरला त्या लोगोच्या अनावरणाचा कार्यक्रम पुढे ढकलून मोकळे झाले.



“इंडिया” आघाडीच्या लोगो संदर्भात अनेक नेत्यांच्या अनेक सूचना आल्या. त्यामुळे त्याच्यावर अजून काम व्हायचे आहे म्हणून आज होणारे अनावरण पुढे ढकलले आहे, अशी माहिती “इंडिया” आघाडीतल्या कोणत्या केंद्रीय नेत्याने नव्हे, तर महाराष्ट्रातले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.

“इंडिया” आघाडीच्या लोगोचे अनावरण होणार असल्याचे ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत काल म्हणाले होते. त्यामुळे त्याचा फार मोठा गाजावाजा माध्यमांमध्ये झाला होता. तो लोगो कसा असेल??, त्यात कोणत्या नेत्यांची आणि पक्षांची कोणती एलिमेंट्स असतील??, याची उत्सुकता जनतेला आहे असे बातम्यांमध्ये लिहिले होते. पण प्रत्यक्षात आज लोगोचे अनावरण पुढे ढकलावे लागले.

“इंडिया” आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षांची स्वतंत्र निवडणूक चिन्हे आहेत. त्यामुळे नवीन लोगो तयार करताना त्यातल्या कोणत्या एलिमेंट्सचा वापर करायचा आणि तो वापर केला तर मूळ पक्षांच्या चिन्हांना किती महत्त्व उरेल आणि तसे महत्त्वच उरले नाही तर मग घटक पक्षांचेच नुकसान होणार नाही का??, याविषयी अनेक नेत्यांनी शंका व्यक्त केल्या. त्यामुळे अखेरीस “इंडिया” आघाडीच्या लोगोचे अनावरण पुढे ढकलावे लागले. त्यातून इंडिया आघाडीलाच राजकीय फाऊल झाला.

 निदान संयोजक तरी नेमणार का??

“इंडिया” आघाडीच्या संयोजक नेमण्यात पहिल्या बैठकीपासून आजच्या तिसऱ्या बैठकीपर्यंत आघाडीतल्या नेत्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे आज तरी मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये होणाऱ्या पत्रकार परिषदेत हे नेते संयोजकाच्या नावाची घोषणा करणार का??, असा सवाल तयार झाला आहे. मात्र, आजची ग्रॅंड हयात मधली बैठक संपल्यानंतर पुढची बैठक तामिळनाडूत आयोजित केल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. त्यामुळे पाटणा, बंगलोर पाठोपाठ मुंबई आणि त्यानंतर चेन्नई अशा बैठकीच्या जागा ठरवून बदलण्यासाठी आधीच्या बैठका घेतल्या का??, असाही कळीचा सवाल तयार झाला आहे.

I.N.D.I.A. leaders failed to decide on the logo of alliance itself and they claim to fight with Modi!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात