विशेष प्रतिनिधी
क्वालंलपूर : नवऱ्यांनी त्यांच्या हट्टी बायकांना शिस्त लावण्यासाठी मारायला हवं. यातून आपण किती कडक शिस्तीचे आहोत आणि बायकोमध्ये बदल करण्यासाठी आपण किती आग्रही आहोत, हे दिसून येईल असे मत मलेशियाच्या मलेशियाच्या महिला व कुटुंब कल्याण विभागाच्या उपमंत्री सिती झैलाह मोहम्मद युसूफ यांनी व्यक्त केले आहे.Husbands should beat their stubborn wives to discipline them, says Women and Family Welfare Minister
सिती युसूफ यांनी एक व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये कौटुंबिक बाबींवर काही सल्ले दिले आहेत.त्यांनी म्हटले आहे की, नवऱ्यांनी त्यांच्या हट्टी बायकांना शिस्त लावण्यासाठी त्यांच्याशी आधी बोललं पाहिजे.
त्यानंतरही त्यांनी वर्तन सुधारलं नाही, तर नवऱ्यांनी तीन दिवस बायकांपासून वेगळं झोपावं. मात्र, त्यानंतर देखील पत्नीमध्ये कोणताही बदल न दिसल्यास नवऱ्याने तिला सावकाशपणे मारायला हवं. यातून आपण किती कडक शिस्तीचे आहोत आणि बायकोमध्ये बदल करण्यासाठी आपण किती आग्रही आहोत, हे दिसून येईल.
महिलांनी आपल्या पतीसोबत तेव्हाच बोलायला हवं, जेव्हा ते शांत असतील, त्यांचं जेवण झालं असेल, प्रार्थना करून झाली असेल आणि निवांत असतील. जेव्हा महिलांना बोलण्याची इच्छा असेल, तेव्हा त्यांनी आधी पतीकडून त्यासाठी परवानगी घ्यायला हवी, असेही सिती युसूफ म्हणाल्या आहेत. सिती युसूफ यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App