ROKHTHOK : तस्लिमा नसरीन म्हणतात हिजाब म्हणजे अत्याचाराचे प्रतीक ! महिलांना लैंगिक वस्तू समजणाऱ्यांनी हिजाब-बुरखा आणला …


एका मुस्लिम-बांगलादेशी महिला लेखिकेला असे वाटते आणि त्या ते उघडपणे सांगतात .यावर कुठलाही बवाल होत नाही .कुणीही मुस्लिमांना उपदेशाचे डोस पाजत नाही .आता भारतातील तथाकथित पुरोगामी वलयांकित महिला गप्प का आहेत ?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिजाब, बुरखा आणि निकाब हे अत्याचाराचे प्रतीक असल्याचे तस्लिमा नसरीन म्हणाल्या. एका खासगी मुलाखतीत त्या बोलत होत्या. हिजाब ७ व्या शतकात आणला गेला होता आता २१ व्या शतकात आपण हे नियम लादू शकत नाही .स्त्री केवळ लैंगिक वस्तू असे माननाऱ्यांनी बुरखा प्रथा आणली.असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे.ROKHTHOK : Hijab is a symbol of oppression: Taslima Nasreen

यासंदर्भात तस्लिमा नसरीन म्हणाल्या की, कर्नाटक उच्च न्यायालयात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब बंदीविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मला वाटते शिक्षणाचा अधिकारच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. काही मुस्लिमांना वाटते की हिजाब खूप महत्त्वाचा आहे. काहींना वाटते की ती एक अनावश्यक गोष्ट आहे. परंतु, सातव्या शतकात स्त्रीविरोधी लोक हे हिजाब घेऊन आले. कारण, ते महिलांना लैंगिक वस्तूंपेक्षा अधिक काही मानत नव्हते, असेही तस्लिमा नसरीन यांनी सांगितले. जेव्हा शारीरिक गरज वाटेल तेव्हाच स्त्रीकडे बघितले जाईल. म्हणूनच महिलांनी बुरखा आणि हिजाब घालावा. त्यांनी स्वतःला पुरुषांपासून लपवावे. आजच्या समाजात स्त्री-पुरुष समान आहेत हे आपण शिकलो आहोत. म्हणूनच हिजाब आणि नकाब हे महिलांवरील अत्याचाराचे लक्षण आहे, असेही तस्लिमा नसरीन यांनी स्पष्ट केले.

हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) हा महिलांना ‘लैंगिक वस्तू’ बनवतो. एखाद्या धर्मनिरपेक्ष देशातील एका शैक्षणिक संस्थेला तिच्या विद्यार्थ्यांसाठी धर्मनिरपेक्ष गणवेश अनिवार्य करण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर अशा संस्था तुम्हाला ‘तुमची धार्मिक ओळख घरीच ठेवा’, असे सांगत असतील, तर त्यात काहीही चूक नाही. शाळेत धार्मिक कट्टरता आणि अंधश्रद्ध यांना जागा असू शकत नाही. शाळांमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य, लैंगिक समानता, उदारमतवाद, मानवता आणि वैज्ञानिक सिद्धांत यांचे शिक्षण दिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एका इंग्रजी वृत्तसंकेतस्थळाला मुलाखत देतांना केले आहे

तस्लिमा नसरीन पुढे म्हणाल्या की, हिजाब, बुरखा आणि नकाब यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे स्त्रीचे उपभोग्य वस्तूरूपात रूपांतर करणे. जरी महिलांना पाहून लाळघोटेपणा करणार्‍या पुरुषांपासून महिलांना लपण्याची आवश्यकता असते, तरीही ही प्रथा अतिशय अपमानास्पद आहे. ही प्रथा लवकरात लवकर बंद केली गेली पाहिजे.

 

हिजाब आणि इस्लाम एकमेकांशी संबंधित आहेत किंवा नाही, हे सूत्र नसून मुळात ७ व्या शतकात बनलेले कायदे २१ व्या शतकात पाळायची आवश्यकता आहे का ?, हे आहे. हिजाब किंवा बुरखा ही एखाद्या महिलेची आवड कधीच नसेल, हे आपल्याला समजून घेतले पाहिजे. तो एखाद्याच्या व्यक्तीमत्त्वाच्या ओळखीचा अविभाज्य घटक होऊच शकत नाही.

ROKHTHOK : Hijab is a symbol of oppression:Taslima Nasreen

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात