काँग्रेसमध्ये “प्रचंड” घडामोडी, हायकमांड हायअलर्ट वर; पण हे सगळे घडतेय अशोक चव्हाण पक्ष सोडून गेल्यावर!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई :  महाराष्ट्र काँग्रेस आणि केंद्रीय काँग्रेस या दोन्ही पातळ्यांवर प्रचंड घडामोडी घडत आहेत. काँग्रेस हायकमांड हायअलर्ट वर आले आहे…, पण हे सगळे अशोक चव्हाण काँग्रेस सोडून गेल्यानंतर घडत आहे!! Huge developments at both Maharashtra Congress and Central Congress levels

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली त्यांच्या पाठोपाठ काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची बातमी आली त्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गडबडले. त्यांनी दिल्ली गाठण्याची भाषा केली. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान हे सगळे नेते एकवटले. त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याबद्दल दुःखमिश्रित आश्चर्य व्यक्त केले.

अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे 10 ते 15 आमदार भाजपात सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण खुलासा करायला समोर आले काँग्रेसमध्ये वरिष्ठ नेत्यांनी सगळ्या आमदारांना पुन्हा फोन करून आपण पक्षातच राहणार असल्याचे कन्फर्मेशन त्यांच्याकडून घेतले. पण अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची गंभीर दखल काँग्रेस हायकमांडने घेतली. हायकमांडने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता घडामोडी घडणार आहेत, असे सांगितले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आमदारांची येत्या 14 फेब्रुवारीला महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसच्या सर्व आमदारांना उपस्थित राहण्याची सक्त सूचना काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांना सूचना दिली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासोबत नेमके किती आमदार आहेत ते स्पष्ट होणार आहे. अशोक चव्हाण यांच्यासह जवळपास 10 आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने वरिष्ठ नेत्यांना सावधगिरीची सूचना देऊन प्रत्येक आमदाराशी पर्सनल संपर्क ठेवण्याची सूचना केली आहे.

काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली

अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीत आगामी काळातील घडामोडी आणि रणनीतीबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे खासदार राहुल गांधी यांच्या भेटीसाठी छत्तीसगडला गेले. ते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. नाना पटोले राहुल गांधी यांच्या भेटीनंतर दिल्लीला जाणार आहेत. तिथे ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Huge developments at both Maharashtra Congress and Central Congress levels

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात