वृत्तसंस्था
ढाका : Shyam Das Prabhu बांगलादेशातील चितगाव येथे इस्कॉनशी संबंधित आणखी एक धार्मिक नेता श्याम दास प्रभू यांना अटक केल्याची बातमी आहे. रिपोर्टनुसार, श्याम दास प्रभू तुरुंगात चिन्मय प्रभू यांना भेटण्यासाठी गेले होते, तेथून त्यांना वॉरंटशिवाय अटक करण्यात आली. इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते राधारमण दास यांनी शुक्रवारी श्याम प्रभू यांच्या अटकेबाबत सांगितले. मात्र, बांगलादेशच्या मीडियामध्ये याबाबत कोणतीही बातमी नाही. त्यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.Shyam Das Prabhu
दुसरीकडे, बांगलादेशातून अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याप्रकरणी गेल्या 24 तासांत 47 जणांना अटक करण्यात आली आहे. यातील बहुतांश हिंदू आणि मुस्लीम मजूर असल्याचे सांगितले जाते. या लोकांनी दलालांच्या मदतीने सीमा ओलांडून अवैधरित्या भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता.
इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिल्यावर कट्टरवाद्यांनी गोंधळ घातला
दुसरीकडे, ढाका उच्च न्यायालयाने इस्कॉनवर बंदी घालण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशातील मूलतत्त्ववादी गटांनी शुक्रवारी मोठा गदारोळ केला. शुक्रवारच्या नमाजानंतर लाखो मुस्लिमांनी देशभरातील मशिदींमध्ये निदर्शने केली.
राजधानी ढाका आणि चितगावमध्ये सर्वात मोठी निदर्शने झाली. आंदोलकांनी इस्कॉनवर ‘हिंदू अतिरेकी संघटना’ आणि ‘मूलतत्त्ववादी आणि देशविरोधी गट’ म्हणून तात्काळ बंदी घालण्याची मागणी केली.
या रॅलींमध्ये हेफाजत-ए-इस्लाम, खिलाफत मजलिस आणि इस्लामिक मूव्हमेंट या कट्टरवादी संघटनांसह अनेक धार्मिक-आधारित संघटना आणि राजकीय पक्षांनी भाग घेतला.
देशातील पराभूत शक्ती अराजकता पसरवण्यासाठी हिंदूंचा वापर करत असल्याचे हिफाजतने म्हटले आहे. गेल्या मंगळवारी चितगाव न्यायालयाच्या संकुलात वकील सैफुल इस्लाम अलिफ यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, तो गृहयुद्ध भडकवण्याचा प्रयत्न होता.
त्याचवेळी चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेसाठी इस्कॉनने कोलकाता येथे निषेध कीर्तन आयोजित केले होते. रविवारी जगभरातील सर्व इस्कॉन मंदिरांमध्ये जागतिक प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे इस्कॉनने जाहीर केले आहे. यामध्ये बांगलादेशातील हिंदू भाविक आणि धार्मिक अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App