विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patole विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. याची कारणे शोधण्यासाठी आता राज्यभर पराभूत उमेदवारांच्या बैठका सुरू आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही हरियाणा व महाराष्ट्राच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून अंतर्गत वादामुळे हे अपयश आल्याचे सांगत कानउघाडणी केली. नागपुरातही चिंतन शिबिर झाले, त्यात सर्वांचा रोष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांच्यावर होता. नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी तर नाना हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी पक्षातून होत आहे.Nana Patole
लोकसभा निवडणुकीपासूनच पटोले यांच्या कार्यशैलीविरोधात अनेक तक्रारी होत्या. नागपूर येथे काँग्रेसच्या अधिवेशनानंतर दिल्लीतून आलेल्या अनेक बड्या नेत्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र राहुल गांधी यांनी कुणाचेच ऐकले नाही. लोकसभेत यश मिळाल्याने पटोले यांची बाजू अधिक भक्कम झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नाना पटोले उघडे पडले. काँग्रेसचे अवघे 16 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना हटवण्याच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्या आधी नवा प्रदेशाध्यक्ष मिळू शकतो, अशी शक्यता काही ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केली आहे.
शनिवारी नागपूरच्या कॉफी हाऊसमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवावर विस्तृत चर्चा व या पराभवाकरिता कोण-कोण जबाबदार यावर चिंतन करण्यासाठी नागपूर येथे शिबिर घेण्याचे ठरले. शिबिराची रूपरेषा ठरवण्यासाठी बुधवारी चार डिसेंबरला प्रमुख नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App