विशेष प्रतिनिधी
सिमला – हिमालयाच्या पर्वतरांगात विसावलेले निसर्गरम्य हिमाचल प्रदेश आता पर्यटकांच्या स्वागतासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. हिमाचल प्रदेशच्या पर्वतरांगात फिरण्याची इच्छा बाळगून असणाऱ्या पर्यटकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. Himachal pradesh opens for tourist
कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने राज्य सरकारने पर्यटन व्यवसाय राज्यात पुन्हा बहाल करण्यासाठी येत्या १ जुलैपासून ई-पास शिवाय पर्यटकांना राज्यात येण्याची मुभा दिली आहे. याशिवाय आंतरराज्य बस सेवा देखील सुरू होत असून ५० टक्के क्षमतेसह बस धावणार आहेत.
कोरोनामुळे बराच काळ घरातच बसून असलेल्या नागरिकांना आता हिमाचलच्या पर्वतरांगात बिनदिक्कत जाता येणार आहे. राज्यातील रुग्णसंख्येत झालेली घट पाहता ई.-पासचे बंधन काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला.येत्या १ जुलैपासून ५० टक्के क्षमतेने आंतरराज्य बससेवा सुरू होत असून ई.-पास प्रणाली बंद केली जाणार आहे.
तसेच सरकारी कार्यालयांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे बराच काळ ओस पडलेली सरकारी कार्यालय आता गजबजणार आहेत. याशिवाय राज्यातील दुकान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत तर रेस्टॉरंट रात्री दहा पर्यंत सुरू ठेवता येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App