मुख्यमंत्र्यांचे ‘संकट पर्यटन’, कोकणवासीयांना ‘आश्वासना’चा लाभ


तौक्ते चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला झोडपल्याने नारळी-पोफळी, आंबा, काजुच्या बागांचे आतोनात नुकसान झाले आहे. गेल्यावर्षीही निसर्ग चक्रीवादळाने कोकणपट्टीत थैमान घातले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारने दिलेली आश्वासनेच अद्याप पूर्ण झालेली नाहीत. गेल्यावर्षीच्या संकटातून कोकणचा शेतकरी स्वतःच्या ताकदीवर उभा राहात असताना पुन्हा यंदा तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची भर पडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर येत असल्याने कोकणवासीयांना त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र मुख्यमंत्री घराबाहेर पडले या एका गोष्टीपलीकडे कोणताही दिलासा तूर्त कोकणच्या जनतेला मिळालेला नाही. ‘पॅकेजवर माझा विश्वास नाही,’ असे सांगून ठाकरे यांनी कोकणवासीयांचा हिरमोड केला. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी संवेदनशील असल्याचे सांगत ‘ते मोठी मदत करतील’, असे ते म्हणाले. The Chief Minister’s ‘crisis tourism’ was over, Just ‘words’ in the pockets of the people of Konkan after Tauktae Cyclone hit


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुत्र पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना घेऊन अखेरीस घराबाहेर आणि मुंबईबाहेर पाऊल टाकले. त्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्गातील नुकसानीची पाहणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या नुकसानीच्या अहवालाची माहिती घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून भरीव, ठोस आश्वासन मिळेल अशी आशा कोकणवासीयांना होती. पण तसे घडले नाही.

“केंद्राच्या निकषाप्रमाणे मदत लगेचच सुरु करु,” एवढेच त्यांनी सांगितले. 90 ते 95 टक्के पंचनामे पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांनी सरकारी यंत्रणेला धन्यवाद दिले. पण या पंचनाम्यांचे सरकार काय करणार हे सांगितले नाही. ‘पॅकेजवर माझा विश्वास नाही,’ असे म्हणून ते मोकळे झाले. ‘मदतीशिवाय कोणी राहणार नाही’, असा शब्द मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला खरा. पण गेल्यावर्षीचे नुकसानग्रस्त अजूनही मदतीविनाच आहेत, हे सांगितल्यावर ‘माहिती घेतो’ असे ते म्हणाले.



एकूणच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्री पुत्रासह संकट पर्यटन केले. प्रत्यक्षात कोकणवासीयांच्या पदरात ठोस काहीच पडले नाही, अशी भावना कोकणात निर्माण झाली आहे. रत्नागिरीत पत्रकारांना मुख्यमंत्री म्हणाले की, पंचनामे पूर्ण होऊ द्या. संपूर्ण आढावा घेऊन व्यवस्थित मदत केली जाईल. रत्नागिरीचे पालकमंत्री अँड. अनिल परब, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आदी यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते.

रत्नागिरी-सिंधुदूर्ग या दोन्ही जिल्ह्यांच्या एका दिवसाच्या पाहणीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांचा दौरा रत्नागिरीतल्या बैठकीने झाला. यावेळी त्यांनी कोरोना संकट स्थितीचाही आढावा घेतला. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यांनी जिल्ह्यातील 6 हजार 766 घरांचे आणि 370 गोठ्यांचे तौक्ते चक्रीवादळाने नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिला. वादळात पडलेल्या झाडांची संख्या हजारापेक्षा जास्त आहे. बाजारपेठेतल्या नुकसानग्रस्त दुकाने व टपऱ्या साठ आहेत. सुमारे 56 शाळांच्या इमारतींनाही वादळाचा फटका बसला आहे. तर अडीच हजार हेक्टर फळबागांचे आतोनात नुकसान झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

तौक्ते चक्रीवादळाने देशाच्या पश्चिम किनारपट्टीला झोडपले. यात कोकणासह मुंबईतही वादळाचा परिणाम पाहण्यास मिळाला. पण प्रत्यक्षात हे वादळ मुंबईपासून दूर खोल समुद्रात दीडशे किलोमीटर अंतरावरून गुजरातच्या दिशेने गेले. गुजरातच्या भूमिवरच हे वादळ धडकले. त्यामुळे गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या अनेक पटीने वित्तहानी झाली. घराचीं पडझड, शेतीचे नुकसान, बाजारपेठेत पाणी घुसून झालेले नुकसान याच जोडीला मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीचाही फटका गुजरातला बसला. या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी करुन चक्रीवादळाने केलेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी लगेच एक हजार कोटी रुपयांची मदत गुजरातला देऊ केली. या संदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘पंतप्रधानांवर नरेंद्र मोदी संवेदनशील आहेत. महाराष्ट्रालाही ते मोठी मदत करतील’

The Chief Minister’s ‘crisis tourism’ was over, Just ‘words’ in the pockets of the people of Konkan after Tauktae Cyclone hit

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात