100 वर्षांचे दीर्घायुष्य जगून हेन्री किसिंजर गेले, पण भारत द्वेष्टे म्हणून लक्षात राहिले!!


अमेरिकेच्या वर्चस्ववादी परराष्ट्र धोरणाचे पुरस्कर्ते हेन्री किसिंजर गेले. त्यांचे अमेरिकन परराष्ट्र खात्यात योगदान खूप मोलाचे राहिले, पण भारतीयांसाठी मात्र ते भारत द्वेष्टे म्हणून लक्षात राहिले!! henry kissinger indira gandhi when henry kissinger called indira gandhi abh indians bastards

हेन्री किसिंजर अमेरिकेच्या लक्षात राहणाऱ्या परराष्ट्र मंत्र्यांपैकी सर्वात वरिष्ठ होते. व्हिएटनाम वॉर पासून ते बांगलादेश मुक्ती पर्यंत वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये ते आघाडीवर राहिले. अमेरिकेचे वर्चस्ववादी परराष्ट्र धोरण पुढे रेटत राहिले. जग “एक ध्रुवीय” असावे आणि तो “ध्रुव” म्हणजेच अमेरिका असावा, ही त्यांच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत धारणा होती. पश्चिम आशिया, चीन आणि काही प्रमाणात रशिया यांच्याबाबतचे परराष्ट्र धोरणातले त्यांचे अंदाज आणि पावले खरी ठरली, अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांच्यात कारकीर्दीत अमेरिका – चीन संबंध “मधुर” झाले. परराष्ट्रमंत्री म्हणून किसिंजर यांचे हे योगदान मोलाचे ठरले, पण भारताबाबतचा मात्र त्यांचा अंदाज चुकला. भारतीयांना विशेषतः पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाला “हलक्यात” घेणे अमेरिकेलाही महागात पडले.

अमेरिकेतील सर्वाधिक वादग्रस्त आणि प्रभावशाली परराष्ट्र मंत्र्यांपैकी ते एक होते. डॉ. हेन्री किसिंजर यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. 1970 च्या दशकात संपूर्ण जग कूस बदलत असताना आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असताना अमेरिकन वर्चस्ववादी परराष्ट्र धोरण राबवून वेगवेगळ्या देशांची वेगवेगळ्या पातळ्यांवर राजनैतिक संबंध वाढवण्याचे कौशल्य हेन्री किसिंजर यांनी दाखविले. हेन्री किसिंजर त्या काळात पश्चिम आशियातील अनेक देशांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झाले.

किसिंजर यांनी पाकिस्तान्यांना झुकते माप दिले, पण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना मात्र त्यांचा प्रभाव पडू शकला नव्हता, किसिंजर यांच्या अपेक्षेविपरीत तो उलटला!! इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानात धाडसाने भारतीय लष्कर घुसविले. या निर्णयामुळेही अमेरिका भारतावर संतापली होती. हा संताप इतका होता की, हेन्री किसिंजर यांनी इंदिरा गांधींसाठी अपशब्द वापरले होते.

– याची कहाणी अशी :

1970 च्या सुरुवातीला पूर्व पाकिस्तानने (सध्याचा बांगलादेश) पश्चिम पाकिस्तान पासून वेगळा होत स्वतंत्र देश निर्माण करण्याची मागणी करत आंदोलन उभारले. पाकिस्तानी लष्कर बंगाली जनतेवर दडपशाही करत होते. यामुळे पूर्व पाकिस्तानातून मोठ्या संख्येने लोक भारतात आश्रय घेण्यासाठी येत होते. अशा स्थितीत इंदिरा गांधींनी मोठा निर्णय घेत या लढाईत उतरण्याची घोषणा केली. इंदिरा गांधींनी पूर्व पाकिस्तानात सैन्य पाठवण्याची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानच्या पराभवाच्या भीतीने अमेरिकेत खळबळ उडाली होती. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर होते. दोघांनीही भारताला रोखण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

इंदिरा गांधींना घाबरवण्याचा प्रयत्न

भारतीय लष्कर कोणत्या स्थितीत पूर्व पाकिस्तानात दखल देऊ नये अशी हेन्री किसिंजर यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी इंदिर गांधींवर दबाव आणण्यास सुरुवात केली होती. किसिंजर यांच्या सल्ल्यावरुन रिचर्ड निक्सन यांनी इंदिरा गांधींचा अपमान करत त्यांना भेटीसाठी ताटकळत ठेवले. यानंतर भेटीदरम्यान रिचर्ड निक्सन यांनी इंदिरा गांधींशी उद्धटपणे संवाद साधत पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून थांबवण्यासाठी दबाव आणला. पण इंदिरा गांधी बधल्या नाहीत. भारताचे संरक्षण करण्याचा भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण अधिकार आहे. भारताच्या सीमेत कोणी घुसत असेल, तर त्याला रोखण्याचाही आम्हाला अधिकार आहे, असे इंदिरा गांधींनी रिचर्ड निक्सन यांना स्पष्टपणे बजावले होते. हेन्री किसिंजर यांनी आपल्याच राष्ट्राध्यक्षाला दिलेला सल्ला इथे उलटा पडला होता.

पूर्व पाकिस्तानातील घटनांमुळे भारतात संकट निर्माण झाले असताना आम्ही हातावर हात ठेवून शांत बसू शकत नाही, असे सांगत इंदिर गांधी यांनी निर्णय बदलण्यास नकार दिला. यानंतर इंदिरा गांधी अमेरिकेतून परतल्या आणि भारतीय लष्कराने पूर्व पाकिस्तानात घुसले. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्याचे समजल्यानतंर किसिंजर संतापले होते. हा संताप इतका होता की, त्यांनी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्याशी संवाद साधताना इंदिरा गांधींचं नाव न घेता अपशब्द वापरले होते. फक्त किसिंजरच नाही, तर राष्ट्राध्यक्षांनीही यावेळी भारतीयासांठी वाईट शब्द वापरले होते.

हेन्री किसिंजर यांनी त्यावेळी मुद्दाम चीनचा दौरा केला आणि त्याचवेळी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना सल्ला दिला होता की, चीनला भारतीय लष्करी ठाण्यांजवळ सैन्य पाठवण्यास सांगा जेणेकरुन भारताला पाकिस्तानविरोधातील युद्ध थांबवावे लागेल. पण चीनने अमेरिकाच अमेरिकेचा तो सल्ला मान्य करण्यास नकार दिला भारतानेही युद्ध थांबविले नाही. त्यामुळे निक्सन – किसिंजर यांच्या आदेशानुसार, अमेरिकन नौदल पाकिस्तानच्या मदतीसाठी पुढे आले होते. पण रशियाने भारताच्या मदतीसाठी युद्धनौका पाठवली. त्यामुळे अमेरिकेला त्यांना माघार घ्यावी लागली होती. हेन्री किसिंजर यांची मुत्सद्देगिरी इथेही कमी पडली. पण त्यांची आढ्यता कायम होती.

अखेर त्यांना उपरती झाली आणि हेन्री किसिंजर यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर तब्बल 34 वर्षांनी 2005 मध्ये, इंदिरा गांधी आणि भारतीयांबद्दल अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती.

इतिहासाचा “असा” साक्षीदार

पण आता हेन्री किसिंजर यांच्या निधनाने वर्चस्ववादी अमेरिकन परराष्ट्र धोरणाचा पुरस्कर्ता काळाच्या पडद्याआड गेला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कालौघात बदलले आहे. भारतानेही आपले “शरणागत” परराष्ट्र धोरण बदलून आक्रमक परराष्ट्र धोरण धारण केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे वाढलेले महत्त्व अमेरिकेला देखील मान्य करावे लागले आहे. हा बदल हेन्री किसिंजर यांना कितीही अपचनीय वाटला तरी तो घडला आहे आणि आधी इतिहास घडविणाऱ्या या नेत्याला इतिहासाचा साक्षीदार म्हणून तो पाहावा लागला आहे!!

henry kissinger indira gandhi when henry kissinger called indira gandhi abh indians bastards

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात