मनोज जरांगेंकडून राहुल गांधींची “कॉपी”; छगन भुजबळांना म्हणाले “पनवती!!”


विशेष प्रतिनिधी

नाशिक :  मराठा आरक्षणाचा विषय आता केवळ सामाजिक न राहता तो पूर्णपणे राजकारणात गुरफटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातही मराठा आरक्षण लढ्याला आता मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ या वैयक्तिक लढाईचा राजकीय रंग चढला आहे आणि या रंगातूनच मनोज जरांगे यांनी चक्क राहुल गांधींची “कॉपी” करत छगन भुजबळ यांना पनवती म्हटले आहे. Manoj jarange copied rahul gandhi, called chagan bhujbal as panauti

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींची जीभ घसरली होती आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनवतीच म्हटले होते. त्यावरून संपूर्ण देशात राजकीय गदारोळ उठून राहुल गांधी सोशल मीडियात ट्रोल देखील झाले होते. पण आता याच राहुल गांधींची “कॉपी” करून मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना पनवती म्हणून त्यांच्यावर टीका केली आहे. छगन भुजबळांना एकेरी भाषेत संबोधत, हा भुजबळ शेतकऱ्याच्या बांधावर जातो कशाला?? तो पनवती आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या मागे साडेसाती लागेल, अशी भाषा मनोज जरांगे यांनी वापरली आहे.

या नव्या वादाची पार्श्वभूमी अशी :

गेल्या दोन दिवसांत राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ त्यांच्या येवला मतदार संघात आले होते. मात्र मराठा आंदोलकांनी या दौऱ्याला विरोध केला. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून छगन भुजबळ शाहपूरसाठी रवाना झाले. येवल्यातील सोमठाण देश गावात मराठा समाजाने छगन भुजबळ यांच्या दौऱ्याचा निषेध केला. ज्या रस्त्याने भुजबळांचा ताफा गेला, त्या रस्त्यावर आंदोलकांनी गोमूत्र शिंपडले. गावातील गावक-यांनी दुकानं बंद ठेवली. सोमठाण देश गावातील गावक-यांचा विरोध पाहता भुजबळांनी त्यांच्या दौऱ्याचा मार्ग बदलला.



मनोज जरांगेंची बोचरी टीका

भुजबळांच्या या दौऱ्यावरून मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा भुजबळांचा एकेरी उल्लेख केला. नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणी दौऱ्यावरून जरांगेंनी टीका केली. हा भुजबळ बांधावर कशाला जातो??, शेतकऱ्याचे पीक आणखी खराब होईल. त्याची सावलीही पडू देऊ नये. छगन भुजबळ पनवती असून, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे साडेसाती लागेल अशा शब्दात जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.

भुजबळ शेतकऱ्यांच्या बांधावर

तरी देखील भुजबळांनी आपला दौरा केलाच. येवल्यामध्ये गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या बांधावर जात भुजबळांनी त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. यावेळी त्यांनी अधिका-यांना तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

Manoj jarange copied rahul gandhi, called chagan bhujbal as panauti

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात