वृत्तसंस्था
काठमांडू : नेपाळमधील ( Nepal )नुवाकोट येथे बुधवारी दुपारी एक हेलिकॉप्टर ( Helicopter ) कोसळले. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 4 चिनी नागरिक आणि एका पायलटचा समावेश आहे. एअर डायनेस्टी हेलिकॉप्टर राजधानी काठमांडूहून रसुवाला जात होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले. नेपाळच्या स्थानिक माध्यमांनुसार, हेलिकॉप्टरने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1:45 वाजता उड्डाण केले.
सुमारे 3 मिनिटांनी हेलिकॉप्टरशी संपर्क तुटला. मात्र हा अपघात का झाला याबाबत माहिती समोर आलेली नाही. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असून एकाचा मृतदेह जळाल्याने त्याची ओळख पटू शकली नाही.
Ladaki Bahin Yojana : रक्षाबंधनाच्या आधीच बहिणींना मिळणार ओवाळणी; लाडकी बहीण योजनेचा हप्ता 17 ऑगस्टला मिळणार
15 दिवसांत दुसरा अपघात
15 दिवसांपूर्वी 24 जुलै रोजी नेपाळमध्ये विमान कोसळले होते. यामध्ये 18 जणांचा मृत्यू झाला. 24 जुलै रोजी सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सौर्य एअरलाइन्सचे होते.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 जण सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 18 जणांपैकी तीन जण एकाच कुटुंबातील होते. यामध्ये मुन राज शर्मा, त्यांची पत्नी प्रीजा खतिवडा आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा आदि राज शर्मा यांचा समावेश होता.
वास्तविक, हे 21 वर्षे जुने विमान दुरुस्त करून चाचणीसाठी नेले जात होते. विमानात उपस्थित असलेले लोक कंपनीचे चाचणी कर्मचारी होते. काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले.
एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली. ते लगेचच विझवण्यात आले. घटनास्थळावरून समोर आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट उठताना दिसत होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App