Karnataka : मुसळधार पावसाने कर्नाटकात कहर, उत्तर कन्नडमध्ये काली नदीवरील पूल तुटला, ट्रक नदीत पडला

Heavy rains in Karnataka

गोवा ते कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील अवजड वाहतूक विस्कळीत झाली


विशेष प्रतिनिधी

कन्नड : सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, कर्नाटकातील  ( Karnataka  ) उत्तर कन्नड जिल्ह्यात काली नदीवर बांधलेला पूल तुटला आहे. त्यामुळे या पुलावरून जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरा कन्नड जिल्ह्यातील काली नदीवरील पूल बुधवारी पहाटे कोसळला, ज्यामुळे गोवा ते कर्नाटकला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 66 वरील अवजड वाहतूक विस्कळीत झाली.

कारवार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या पुलावरून ट्रक जात असताना पुलाचा मोठा भाग कोसळला, त्यामुळे वाहन चालक नदीत पडून जखमी झाला.



अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दशकभरापूर्वी नवीन पूल बांधल्यानंतर या पुलाचा वापर गोव्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी करण्यात आला. तामिळनाडू येथील बाला मुरुगन असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. कारवारला जाणारा ट्रक पाण्यात पडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर रात्रीच्या गस्ती पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली.

पोलिस अधीक्षक म्हणाले, “आमच्या रात्रीच्या गस्ती पथकाने कोसळलेला पूल पाहिला आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नदीत एक ट्रक होता आणि जखमी चालक वाहनाच्या वर होता. आमच्या टीमसह स्थानिक मच्छिमारांनी चालकाला वाचवण्यात यश मिळविले. .” ते म्हणाले, “त्याला कारवार इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक चालकाची प्रकृती स्थिर असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.”

Heavy rains in Karnataka bridge over Kali river broke

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात