विरोधकांच्या आरोपांना दिले चोख प्रत्युत्तर ; जाणून घ्या, सविस्तर माहिती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू विनेश फोगट ( Vinesh Phogat )हिला ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. याबाबत अनेकांची सरकारवर नाराजी होती. सरकारने विनेशला साथ दिली नाही, असे अनेकांनी सांगितले. तिला मदत दिली नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप केला जात आहे. पण लोकसभेत क्रीडामंत्र्यांनी दिलेल्या उत्तराने सरकारने विनेशला पूर्ण मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेश फोगटला किती पैसे दिले, काय पुरवले होते हेही सांगण्यात आले आहे.
ऑलिम्पिकच्या तयारीसाठी विनेश फोगटला खूप मदत करण्यात आली, असे क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत सांगितले. तिच्यासाठी खास वैयक्तिक प्रशिक्षक नेमण्यात आले होते. हंगेरीचे तज्ञ प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग एक्सपर्ट, स्पारिंग पार्टनर नियुक्त केले गेले. या सर्वांना सरकारने पैसे दिले होते. विनेशच्या ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सरकारने 70,45,775 रुपये खर्च केल्याचे क्रीडामंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी खर्चाची संपूर्ण माहितीही दिली.
मांडविया यांनी सांगितले की, विनेश फोगटला स्पेनमधील ग्रॅण्ड प्रिक्समध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत केली गेली होती. तसेच, 3 जुलै ते 13 जुलै दरम्यान माद्रिद येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली. याशिवाय फ्रान्समधील बोलोन-सुर-मेर येथे ऑलिम्पिकपूर्व प्रशिक्षणासाठी अतिरिक्त मदत देण्यात आली. आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेची दुसरी मालिका बुडापेस्ट, हंगेरी येथे 6 जून ते 9 जून या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. हंगेरीतील टाटा ऑलिम्पिक केंद्रात 10 जून ते 21 जून दरम्यान विशेष कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले.
क्रीडामंत्र्यांनी सांगितले की स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक नियुक्त करण्यासाठी मदत करण्यात आली. 13 जुलै ते 16 जुलै दरम्यान हंगेरीमध्ये चौथ्या रँकिंग मालिकेदरम्यानही तिला मदत देण्यात आली होती. तिला बल्गेरियातील बेल्मेकेन येथे प्रशिक्षणासाठी आर्थिक मदतही देण्यात आली. तसेच तिला पुनर्वसनासाठी काही उपकरणे खरेदी करायची होती, त्यासाठी सरकारने मदतही केली. एकूण, टार्गेट ओलंपिक पोडियम स्कीम अंतर्गत, तिला 53 लाख 35 हजार 746 रुपये आणि एसीटीसीकडून 17 लाख 10 हजार 029 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App