उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने दैना, १९ जणांचा मृत्यू ; दोन दिवस शाळा बंद

विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने दाणादाण उडविली आहे. शेकडो गावे पाण्याखाली गेले असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांत पावसामुळे १९ जणांचा मृत्यू झाला आहे.Heavy rain in Uttar Pradesh

राज्यात येत्या चोवीस तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सरकारने महाविद्यालय आणि शाळा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १७ आणि १८ सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्यात येत असून लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



 

मुसळधार पावसामुळे प्रतापगड जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत एक लहान बाळासह सात जणांचा मृत्यू झाला. प्रतापगड जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात प्रतापगड आणि अयोध्या येथे सर्वाधिक २० सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

याशिवाय फुरसतगंज (अमेठी), कुंडा, मऊ, बस्ती, लालगंज, रायबरेली येथे १७ सेंटीमीटर पावसाची नोंद झाली.राजधानी लखनौत ११ सेंटीमीटर पाऊस पडला. रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळित झाली आहे. प्रतापगडव्यतिरिक्त जौनपूर येथे चार, फतेहपूर येथे तीन, बाराबंकी येथे दोन, कुशीनगर आणि सुलतानपूर येथे प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

Heavy rain in Uttar Pradesh

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात