उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने घेतला १९ जणांचा बळी, अनेक शहरे जलमय


विशेष प्रतिनिधी

लखनौ – उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले असून विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. राजधानी लखनौत देखील पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. विमानतळाच्या धावपट्टीवर देखील पाणी साचले आहे. Massive rain in UP, 19 killed



लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूरसारख्या मोठ्या शहरात मुसळधार पावसाने रस्ते आणि कॉलनी जलमय झाले आहेत. लखनौमध्ये पावसाची स्थिती आणि अंदाज पाहता नागरिकांना घरीच थांबण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व दौरे रद्द केले आहेत. लखनौच्या अमोसी विमानतळाच्या धावपट्टीवर पाणी आले आहे. लखनौ-फैजाबाद महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी आले आहे

लखनौ, प्रयागराज, वाराणसी, कानपूर, अयोध्या, जौनपूर, सुलतानपूर, भदोही, गाझीपूर, चित्रकूट, बहराईच, बांदा, देवरिया, इटावा, फतेहपूरसह अनेक जिल्ह्यात दोन दिवस झाले पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून काही ठिकाणी घरातही पाणी शिरले आहे. लखनौत गेल्या नऊ तासात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाने नोंद केली आहे. हवामान खात्याच्या मते, मध्यरात्री १२ पासून सकाळी ९ वाजेपर्यंत लखनौत १०९.२ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

Massive rain in UP, 19 killed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात