विशेष प्रतिनिधी
भोपाळ – मध्यप्रदेशच्या उत्तर भागातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले असून राज्यातील तब्बल १ हजार २०० खेड्यांना त्याचा फटका बसला आहे. लष्कराप्रमाणेच एनडीआरएफ, बीएसएफ आणि राज्यातील निमलष्करी दले मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.विविध गावांमध्ये १ हजार ९५० लोक अडकून पडले आहेत. Heavy flood in MP
काही भागांतील पूर ओसरू लागला असला तरीसुद्धा शेवोपूर जिल्ह्यातील अनेक गावे पुरामध्ये पूर्णपणे बुडाली आहेत. या भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दतिया जिल्ह्यातील ३६ खेड्यांतून १ हजार १०० लोकांना हवाईमार्गे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याच भागातील दोन पूल मात्र पुराच्या पाण्यामुळे कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
शिवपुरी आणि ग्वाल्हेरदरम्यानची रेल्वेसेवा आणि मोरेना जिल्ह्यातील दूरसंचार सेवेला याचा पुराचा जबर फटका बसला आहे. पूरग्रस्तभागांतील मदत आणि बचाव कार्यामध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर देखील सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App