गुजरात एटीएसने पोरबंदरमधून ISISशी संबंधित 5 जणांना केली अटक, परदेशात पळून जाणार होते


वृत्तसंस्था

पोरबंदर : गुजरात पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) श्रीनगरमधील 4 तरुणांना आणि सुरतमधील एका महिलेला पोरबंदरमधून अटक केली आहे. त्यापैकी एक परदेशी नागरिक आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौघांचेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ISIS (K) शी संबंध आहेत. महिलेकडून चार मोबाईल आणि इतर डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.Gujarat ATS arrests 5 people associated with ISIS from Porbandar, who were going to flee abroad

गुजरात एटीएसचे आयजी दीपेन भद्रन यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेले पाच जण दहशतवादी संघटना ISIS खोरासानच्या मॉड्यूलचा भाग आहेत. ते गेल्या एक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि ISIS मध्ये सामील होण्यासाठी देश सोडून जाण्याचा विचार करत होते.



हे सर्वजण ISISच्या मॉड्यूलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना कट्टर बनवण्याचे काम करत होते. यासोबतच गुजरातशी संबंधित गुप्त माहिती परदेशात पाठवली जात होती. गेल्या अनेक दिवसांपासून पोरबंदर आणि परिसरात एटीएसचे सर्च ऑपरेशन सुरू होते. या कारवाईअंतर्गत या 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

इराणमार्गे अफगाणिस्तानला जाणार होते

गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी आणि एटीएस यांच्या पत्रकार परिषदेत इस्लामिक स्टेट ऑफ खोरासान (ISKP) या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित चार कट्टरपंथी तरुण गुजरातच्या सागरी मार्गाने देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याची माहिती देण्यात आली. हे चौघेजण इराणमार्गे अफगाणिस्तानला जात होते. याबाबत गुजरात एटीएसला ठोस माहिती मिळाली होती.

यानंतर पथकाने 4 तरुणांना 9 जून रोजी पोरबंदर रेल्वे स्थानकाजवळ ताब्यात घेतले. यानंतर त्याच्या साथीदार महिलेला सुरत येथून अटक करण्यात आली. उबेद नासीर मीर, हनान हयात शॉल, मोहम्मद हाजीम शाह आणि जुबेर अहमद मुन्शी अशी अटक केलेल्या चार तरुणांची नावे आहेत. त्यांचे स्थानिक दुवे शोधले जात आहेत.

Gujarat ATS arrests 5 people associated with ISIS from Porbandar, who were going to flee abroad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात