पंतप्रधान मोदींचे दुबईत भव्य स्वागत ; जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत भाग घेणार!

Prime Minister Modi
  • मोदींची एक झलक पाहण्यासाठी भारतीय समुदायाची मोठी गर्दी

विशेष प्रतिनिधी

दुबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी रात्री उशीरा दुबईला पोहोचले. जिथे भारतीय समुदायाने त्यांचे भव्य स्वागत केले. पंतप्रधान मोदी आज (शुक्रवारी) जागतिक हवामान कृती शिखर परिषदेत (COP28) सहभागी होणार आहेत.Grand welcome to Prime Minister Modi in Dubai Participate in the Global Climate Action Summit



दुबईत मोदींची एक झलक पाहण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी भारतीय समुदायाने पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम’च्या घोषणा दिल्या. तसेच ‘सारे जहाँ से अच्छा’ गाऊन पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. दुबईला पोहोचल्यानंतर मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

इम्रान खान यांनी पुन्हा केले पंतप्रधान मोदींचे कौतुक; शाहबाज सरकारला दिल्या कानपिचक्या, मोदी-बायडेन यांची पाकला चपराक

पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, “COP-28 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी दुबईला पोहोचलो आहे. शिखर परिषदेच्या कार्यवाहीची वाट पाहत आहे, ज्याचा उद्देश एक चांगला ग्रह तयार करणे आहे.” यासोबतच दुबईत भारतीय समुदायाने केलेल्या स्वागताचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. ते म्हणाले की, भारतीय समुदायाचा पाठिंबा आणि उत्साह हा आपल्या संस्कृतीचा आणि दृढ संबंधांचा पुरावा आहे.

Grand welcome to Prime Minister Modi in Dubai Participate in the Global Climate Action Summit

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात