दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांची टीका
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: कोलकात्याच्या सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्काराच्या घटनेवरून पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस ( CV Anand Bose ) यांनी बंगाल सरकारवर टीका केली आहे. सीव्ही आनंद बोस म्हणाले की, बंगाल हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. बंगालने आपल्या महिलांची निराशा केली आहे. समाजाचा नाही तर सध्याच्या सरकारने महिलांची निराशा केली आहे.
तसेच बंगालला त्याचे जुने वैभव परत आणले पाहिजे, जिथे महिलांना समाजात मानाचे स्थान होते. महिलांना आता गुंडांची भीती वाटू लागली आहे, हे या प्रश्नाबाबत असंवेदनशील असलेल्या सरकारने निर्माण केले आहे. असंही ते म्हणाले.
आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील बलात्कार-मृत्यूच्या घटनेतील मृत डॉक्टरच्या कुटुंबीयांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, “मी आईच्या भावनांचा आदर करतो. कायदा आपल्या मार्गावर जाईल.” कोलकाता येथील सरकारी आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या विरोधात देशभरातील निवासी डॉक्टर निदर्शने करत आहेत.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या निवासी डॉक्टर्स असोसिएशनने (आरडीए) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशभरातील आरोग्य कर्मचारी आणि संस्थांच्या सुरक्षेसाठी अध्यादेशाद्वारे केंद्रीय कायदा लागू करण्याची विनंती केली आहे. .
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आतापर्यंत एकाला अटक करण्यात आली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App