निवडणूक आयोगाचा धक्कादायक खुलासा
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने सोमवारी सांगितले की, पाच राज्यांमध्ये फुकट वस्तू, ड्रग्ज, रोख रक्कम, दारू आणि 1,760 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत आणि या सर्व गोष्टी मतदारांना आकर्षित करण्यासाठी होत्या. Goods cash and liquor worth more than Rs 1760 crore seized from five states
आयोगाने म्हटले आहे की, 9 ऑक्टोबर रोजी निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आतापर्यंत झालेली जप्ती ही या राज्यांतील 2018 मधील गेल्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या जप्तीपेक्षा सातपट जास्त आहे.
निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीला बजावली कारणे दाखवा नोटीस!
मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले आहे, तर राजस्थानमध्ये 25 आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आयोगाने दिलेल्या निवेदनानुसार, यापूर्वी गुजरात, हिमाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, त्रिपुरा आणि कर्नाटक या सहा राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये 1,400 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App