ram temple in ayodhya : अयोध्येत उभारले जाणारे भव्य राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. भारतासह जगभरातील भाविक प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ शकतील. राम मंदिर ट्रस्टच्या हवाल्याने सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वीही राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने म्हटले होते की, 2023च्या अखेरीस मंदिराचा मुख्य परिसर तयार होईल आणि त्यानंतर ते भक्तांसाठी खुले केले जाऊ शकते. Good News ram temple in ayodhya to open for devotees by december 2023 says sources
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अयोध्येत उभारले जाणारे भव्य राम मंदिर डिसेंबर 2023 पर्यंत भक्तांसाठी खुले होणार आहे. भारतासह जगभरातील भाविक प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊ शकतील. राम मंदिर ट्रस्टच्या हवाल्याने सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यापूर्वीही राम मंदिराच्या बांधकामाची देखरेख करणाऱ्या श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने म्हटले होते की, 2023च्या अखेरीस मंदिराचा मुख्य परिसर तयार होईल आणि त्यानंतर ते भक्तांसाठी खुले केले जाऊ शकते.
मंदिराच्या बांधकामाशी संबंधित लोकांनी या वर्षाच्या सुरुवातीपासून अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे की, दोन वर्षांच्या आत मंदिरात पूजा सुरू होईल आणि सामान्य भक्तांना श्रीरामाचे दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, डिसेंबर 2023 पर्यंत मंदिराचे काम जवळपास पूर्ण होईल आणि लोक प्रभू श्रीरामाची पूजा करू शकतील.
गुरुवारी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीला एक वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला भेट देतील. असे म्हटले जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील या कार्यक्रमाला व्हर्च्युअली संबोधित करू शकतात.
गेल्या वर्षी कोरोना प्रतिबंधादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन केले होते. अयोध्येत आयोजित सरकारी कार्यक्रमांतर्गत 100 पेक्षा जास्त लोकांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ दिला जाईल. तत्पूर्वी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील योजनेच्या लाभार्थींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
Good News ram temple in ayodhya to open for devotees by december 2023 says sources
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App