राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाचाही घेतला आहे समाचार
विशेष प्रतिनिधी
पाटणा – बिहारमधील बेगुसराय येथील खासदार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेप्रकरणी मौन बाळगल्याबद्दल टोला लगावला आहे. गिरीराज सिंह म्हणाले, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राहुल गांधींच्या अपात्रतेवर बाळगलेले “मौन” दर्शवते की जेडी(यू) नेते विरोधी गटाच्या नेतृत्वावर दावा करण्याच्या वाढत्या शक्यतांबद्दल आनंदी आहेत. Giriraj Singh comment on Nitish Kumar calm attitude regarding Rahul Gandhi disqualification
याशिवाय गिरीराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्या ‘माझे नाव सावरकर नाही’ या वक्तव्यावर टीका केली. त्यांनी म्हटले की, सावरकर समजण्यासाठी राहुल गांधींना अनेक जन्म घ्यावे लागतील.
VIDEO : तसंही कुणीतरी म्हटलेलंच आहे, “ हर गांधी महात्मा नही होता” तेच खरं – भाजपाने लगावला टोला!
काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी यांना ‘मोदी आडनाव’ बद्दल अपमानास्पद टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. तसेच, राहुल गांधींना गुजरातच्या सुरत कोर्टात मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. यानंतर कायद्यानुसार त्यांचे संसदेचे सदस्यत्व संपुष्टात आले आहे. याप्रकरणी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे नेते, कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App