Mission Lok Sabha 2024 : उत्तर प्रदेश भाजपची नवी टीम जाहीर; १८ उपाध्यक्ष आणि सात सरचिटणीसांच्या नावांची यादी जाहीर

BJP Yogi

 उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत असलेल्या भारतीय जनता पार्टीने उत्तर प्रदेशमध्ये आपली नवी टीम जाहीर केली आहे. पक्षाच्या वतीने संघटनेचे १८ प्रदेश उपाध्यक्ष, ७ सरचिटणीस आणि सर्व सहा क्षेत्रांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत योगी सरकारमध्ये मंत्री झालेले जेपीएस राठोड, एके शर्मा आणि दैशंकर सिंह यांच्या जागी अन्य चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. Mission Lok Sabha 2024  Uttar Pradesh BJPs new team announced

पक्षाने नोएडातील आमदार पंकज सिंह, विजय बहादूर पाठक, कांता कर्दम, संतोष सिंह आणि १८ नेत्यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. दुसरीकडे गोविंद नारायण शुक्ला, अनूप गुप्ता, अमरपाल मौर्य, प्रियांका सिंह रावत यांची पुन्हा एकदा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

VIDEO : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक; कर्नाटकात रोड शो दरम्यान वाहन ताफ्याकडे धावत सुटला तरूण अन्…

उत्तर प्रदेश भाजपाचे संघटन सरचिटणीस धरमपाल सिंह आणि प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांनी नुकतीच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. तिन्ही नेत्यांनी भाजपाच्या नव्या टीमच्या नावावर चर्चा केली होती.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य आहे. यासाठी पक्ष मिशन ८० वर काम करत आहे. त्यादृष्टीने सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. २०२४ च्या निवडणुका प्रदेशाध्यक्ष भूपेंद्रसिंह चौधरी यांच्या नेतृत्वाखाली होणार आहेत. अशा स्थितीत राज्य संघटनेबाबतही विचारमंथन सुरू होते. ज्याची आता घोषणा करण्यात आली आहे.

Mission Lok Sabha 2024  Uttar Pradesh BJPs new team announced

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात