अन् अनेक वर्षांनी स्मृती इराणींना ‘त्या’ कटू आठवणींमुळे झाले अश्रू अनावर

Smriti Irani new

‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ मालिकेसाठी शूटींग करत असताना घडलेला प्रसंग सांगितला

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या टीव्ही मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांचा गर्भपात झाल्याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना शूटवर बोलावण्यात आले होते. स्मृती यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे, जो शनिवारी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला. And after many years Smriti Irani was very sad because of those bad memories

स्मृती यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांनी निर्माती एकता कपूरचे कान भरले होते की गर्भपात खोटा आहे. म्हणून स्मृती इराणी दुसऱ्या दिवशी मेडिकल रिपोर्ट घेऊन एकता कपूरकडे गेल्या होत्या. त्यांनी एकताला सांगितले की, त्यांचा गर्भ जगला असता तर तोही पुरावा म्हणून आणला असता.

स्मृती दोन शिफ्टमध्ये काम करायच्या –

‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ फेम स्मृती इराणी नुकत्याच नीलेश मिश्राच्या मुलाखतीत दिसल्या होत्या. यादरम्यान त्यांनी त्यांच्या टीव्हीच्या काळातील काही पडद्या आडच्या गोष्टींचा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, त्या दिवसा रामायण मालिकेसाठी आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’  मालिकेसाठी शूट करायच्या. या दरम्यान त्या गरदोर झाल्या आणि नंतर त्यांनी माणुसकीचा एक धडा शिकायला मिळाला.

शूटींगवरून परत येताना सुरू झाला होता रक्तस्त्राव –

स्मृती इराणींनी सांगितले की, मला नव्हतं माहिती की मी गरोदर आहे. मी तेव्हा मालिकेच्या सेटवर होते. मी तेव्हा निर्मात्याला सांगितले की मला सध्या अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे कृपया मला घरी जाऊ द्या. यानंतरही मी तोपर्यंत काम केले जोपर्यंत मला जाऊ दिलं गेलं नाही, जेव्हा मी निघाले तेव्हा संध्याकाळ झाली होती. डॉक्टरांनी मला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. अर्ध्या रस्त्यातच माझा रक्तस्त्राव सुरू झाला. मला आठवते की तेव्हा पाऊस सुरू होता, मी रिक्षावाल्याला सांगितले की मला लवकर रुग्णालयात घेऊ चला.

गर्भपाताच्या दुसऱ्याच दिवशी शूटींगला येण्यास सांगितलं गेलं –

स्मृती इराणींनी पुढे सांगितले की, जेव्हा मी रुग्णालयात पोहचले तेव्हा एक परिचारिका पळत आली आणि मला स्वाक्षरी मागू लागली. मी तिला म्हणाली मला रुग्णालयात दाखल करून  घ्या, कारण मला वाटतंय माझा गर्भपात झाला आहे. या घटनेच्या एका दिवसानंतर क्योंकी सास भी कभी बहू थी मालिकेच्या प्रोडक्शन टीमकडून फोन आला होत आणि शूटींगला येण्यास सांगितले होते. मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला म्हणाले होते ना माझा गर्भपात झाला आहे आणि मला अस्वस्थ वाटत आहे. त्यावर त्यांनी म्हटलं की, काही नाही, उद्या २ वाजता शूटींगला या.

केवळ रवी चोप्रा यांनी दाखवले औदार्य –

याशिवाय स्मृती इराणी म्हणाल्या, ‘सास भी कभी बहू थी’ मालिकेत त्यांच्याशिवाय ५० अन्य पात्र सुद्धा होते, मात्र रामायणात त्या सीतेचं पात्र करत होत्या, त्यामुळे त्यांना काही पर्याय नव्हता. खरंतर तेव्हा रवी चोप्रा यांनी खूप मोठेपणा दाखवला. स्मृती इराणी यांनी रवी चोप्रा यांनी त्यांना होणारा त्रास सांगितला व विनंती केली की त्या सात वाजेच्या शिफ्टमध्ये एक तास येऊ शकते का? उत्तरात रवी चोप्रा यांनी सांगितले की, तू वेडी आहेस का, तुला माहीत आहे की एक मूल गमावण्याचं दु:ख काय असतं, उद्या येण्याची काही गरज नाही.

And after many years Smriti Irani was very sad because of those bad memories

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात