‘’भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, ते स्वत: … ‘’ रविशंकर प्रसाद यांचा घणाघात!

Rahul Gandh and Ravishamkar Prasad

खोटे बोलणे हा राहुल गांधींचा स्वभाव बनला आहे, असंही रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.

प्रतिनिधी

पाटणा : गुजरातच्या सुरत कोर्टाने गुन्हेगारी मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. तेव्हापासून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत. संसदेचे सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी शनिवारी पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिसले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. BJP leader Ravi Shankar Prasad criticized Congress leader Rahul Gandhi

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच आले प्रसारमाध्यमांसमोर, म्हणाले…

याला उत्तर देताना भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ”राहुल गांधींवर मानहानीचे ६० खटले सुरू आहेत. सगळे मोदी चोर का आहेत? असं म्हणत त्यांनी मागासलेल्या समाजाचा अपमान केला होता. टीका करणे म्हणजे शिव्या देणे नव्हे.” रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले की, ”आज त्यांच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, मी विचार करून बोलतो,  म्हणजे २०१९ मध्ये राहुल गांधी जे बोलले ते विचार करूनच बोलले होते, जेव्हा त्यांनी मागास वर्गीयांचा अपमान केला होता.”

राहुल गांधींना शिवीगाळ करण्याचा अधिकार नाही –

याशिवाय रविशंकर प्रसाद पत्रकार परिषदेत  म्हणाले की,  ”मोदी आडनाव असलेली सर्वाधिक नागरिकांची संख्या मागास समाजातून येते. टीका करणे म्हणजे शिव्या देणे नव्हे, देशात कोणालाही शिवीगाळ करण्याचा अधिकार नाही. राहुल यांनी मागासलेल्या समाजाला शिवीगाळ आणि अपमान केला आहे. राहुल यांना चुकीचे बोलण्याचा अधिकार असेल तर मागासलेल्यांनाही न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने राहुल गांधींना माफी मागण्याची संधी दिली असता त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे.”

जाणूनबुजून मागासलेल्यांचा अपमान केला –

”राहुल गांधींनी जाणूनबुजून मागासलेल्यांचा अपमान केला असे भाजपाचे मत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. तसेच रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर परदेशात खोटे बोलत असल्याचाही आरोप केला. ‘’आज राहुल गांधी पुन्हा खोटे बोलले की मी लंडनमध्ये काहीच बोललो नाही. भारतात लोकशाही कमकुवत होत असून युरोपीय देश लक्ष देत नसल्याचे राहुल गांधी यांनी लंडनमध्ये म्हटले होते. खोटे बोलणे हा राहुल गांधींचा स्वभाव बनला आहे. भ्रष्टाचारावर बोलण्यापूर्वी राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे, ते स्वत: भ्रष्टाचाराच्या प्रकरणात जामिनावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांत प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे आज भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. पंतप्रधान मोदींबद्दल बिनबुडाचे वक्तव्य करताना काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. ’’ असा घणाघात भाजपाकडून करण्यात आला आहे.

BJP leader Ravi Shankar Prasad criticized Congress leader Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात