केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्यात हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.Gas cylinders can now be filled from the desired distributor, Central Government’s decision on an experimental basis in Pune
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्राहकांना हव्या त्या वितरकाकडू गॅस सिलेंडर घेण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर पुण्यात हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.
देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सुविधेची चाचपणी केली जाणार असून त्यामध्ये पुण्याचा देखील समावेश आहे. त्यामुळे पुणेकरांना लवकरच आपल्याला हव्या त्या वितरकाकडून गॅस सिलेंडर भरून घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार देशातल्या काही शहरांमध्ये ही सेवा प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला उपलब्ध होणार असून त्याच्या निष्कर्षांनंतर व्यापर स्तरावर देशभरात या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या एचपी, भारत पेट्रोलियम आणि इंडेन या कंपन्यांचे गॅस सिलेंडर वापरासाठी उपलब्ध आहेत.
मात्र, हे सिलेंडर वितरीत करण्यासाठी स्थानिक पातळीवर वितरकांना एजन्सी दिली जाते. मात्र, आता आपल्या परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही वितरकाकडून आपण संबंधित कंपनीचा गॅस सिलेंडर घेऊ शकतो. यासाठी निवडण्यात आलेल्या शहरांमध्ये पुणे शहरासोबतच चंदीगढ, कोयम्बतूर, गुरगाव आणि रांची या शहरांचा देखील समावेश आहे.
गेल्या वर्षभरापासून देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे अनेक कंपन्यांनी ऑनलाईन किंवा मोबाईलवर सिलेंडर बुक करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. इंडेन, एचपी आणि भारत पेट्रोलियम या प्रमुख कंपन्यांचे गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत.
त्यानुसार मोबाईल अॅप किंवा ऑनलाईन वेबसाईटवरून सिलेंडर बुकिंग करताना ग्राहकांना त्यांच्या परिसरात सेवा देणाºया डिलिव्हरी डिस्ट्रिब्युटर्सची अर्थात वितरकांची यादी दाखवली जाईल. त्यामधून ग्राहकांना हवा तो पर्याय निवडण्याची सुविधा असेल.
वितरकांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्यास त्यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल. तसेच, ग्राहकांना देखील पर्याय निवडण्याचा अधिकार मिळेल. वितरकांना त्यांची सेवा सुधारण्यासाठी देखील मदत मिळू शकेल. ही सेवा प्रायोगिक तत्वावर कधीपासून सुरू होईल, याविषयी अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App