किंमती वाढूनही गॅस सिलेंडरची मागणी वाढतीच, उज्वला गॅस योजनेतील कुटुंबांकडून जादा मागणी

स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली असली तरी गेल्या तीन महिन्यात गॅसची मागणी ७.३ टक्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये उज्वला गॅस योजना असलेल्या कुटुंबांचा समावेश जास्त आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसच्या सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली असली तरी गेल्या तीन महिन्यात गॅसची मागणी ७.३ टक्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे यामध्ये उज्वला गॅस योजना असलेल्या कुटुंबांचा समावेश जास्त आहे. Despite a steep price rise Cooking gas LPG consumption rose 7.3 per cent in the last three months

चूलमुक्त देशाचे स्वप्न पाहत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतून उज्वला गॅस योजना आकारास आली. देशातील अति गरीब कुटुंबांना यातून गॅस कनेक्शन देण्यात आले आहेत. गॅसच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक कुटुंबांनी गॅसवापर सोडून दिला असून पुन्हा चुलीकडे वळले असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, आकडेवारीनेच त्यांना उत्तर दिले आहे. गोरगरीब कुटुंबांत गॅसचा वापर २० टक्यांनी वाढला आहे.तेलकंपन्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उज्वला गॅस योजनेतून सिलेंडर घेतलेल्यांमध्ये गॅसचा वापर वाढला आहे. डिसेंबर २०२० ते फेबु्रवारी २०२१ या तीन महिन्यांच्या काळात गॅस सिलेंडरच्या दरात १७५ रुपयांची वाढ झाली. मात्र, तरीही वापर वाढलेलाच आहे. प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेतून देशातील आठ कोटी गरीब कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. त्यांच्यामध्येही वापर वाढला आहे.

आंतरराष्टÑीय बाजाराचे पडसाद पडून गॅस सिलेंडच्या किंमती वाढल्या आहेत. मात्र, कॉँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष त्यामुळे आक्रमक झाले आहेत. सामान्य नागरिक वाढत्या किंमतीमुळे गॅस सिलेंडर वापरेनासे झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र, तेल कंपन्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार वापर वाढला आहे.
पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी लोकसभेत बोलताना सांगितले होते की गेल्या सात वर्षांत गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. १ मार्च २०१४ रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती. सध्या ती ८१९ रुपये आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला गॅसच्या मागणीत घट झाली होती. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गॅस सिलेंडरच्या वाहतुकीला अडधळा येत असल्याने ही मागणी घटली होती. मात्र, डिंसेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या काळात ही मागणी पुन्हा एकदा वाढली आहे.

Despite a steep price rise Cooking gas LPG consumption rose 7.3 per cent in the last three months

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*