fugitive Nirav Modi : पळपुटा हिरे व्यावसायिक नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. यूकेच्या गृहमंत्रालयानेही त्याला नुकतीच मान्यता दिली. परंतु, भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी नीरव मोदीचे प्रयत्न सुरूच आहेत. नीरव मोदीने प्रत्यार्पणाविरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने अनेक युक्तिवाद केले आहेत. तथापि, ते सिद्ध करणे नीरव मोदीसाठी आव्हानात्मक असणार आहे. fugitive Nirav Modi appeal to England High Court to avoid Extradiction to India
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पळपुटा हिरे व्यावसायिक नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. यूकेच्या गृहमंत्रालयानेही त्याला नुकतीच मान्यता दिली. परंतु, भारतातील प्रत्यार्पण टाळण्यासाठी नीरव मोदीचे प्रयत्न सुरूच आहेत. नीरव मोदीने प्रत्यार्पणाविरोधात ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने अनेक युक्तिवाद केले आहेत. तथापि, ते सिद्ध करणे नीरव मोदीसाठी आव्हानात्मक असणार आहे.
नीरव मोदीने बुधवारी यूके उच्च न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणाविरोधात अपील करण्यासाठी प्राथमिक आधार दाखल केला आहे. यामध्ये त्यांनी वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी कोर्टाने भारत प्रत्यार्पणासाठी आणि 15 एप्रिल रोजी यूकेच्या गृहसचिव प्रभा पटेल यांच्या मान्यतेला आव्हान दिले आहे. नीरव मोदीच्या वकिलांच्या मते, अपील सिद्ध करण्यासाठी आधार तयार करण्यात आले आहेत. लवकरच ते दाखल करण्यात येतील. सध्या अपीलचे प्राथमिक आधार आहेत.
CORRECTION | Fugitive diamantaire Nirav Modi files an appeal in the UK High Court seeking permission to challenge the decision against the extradition order made by the lower court and passed by the UK Home Secretary. (File photo) pic.twitter.com/CrTZme2jgZ — ANI (@ANI) May 1, 2021
CORRECTION | Fugitive diamantaire Nirav Modi files an appeal in the UK High Court seeking permission to challenge the decision against the extradition order made by the lower court and passed by the UK Home Secretary.
(File photo) pic.twitter.com/CrTZme2jgZ
— ANI (@ANI) May 1, 2021
नीरव मोदीच्या याचिकेत भारतात खटला योग्य पद्धतीने न चालण्याची आणि राजकीय कारणांमुळे लक्ष्य केले जाण्याची काळजी व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील तुरुंगांची स्थिती कमकुवत असून त्याच्याविरुद्ध पुरावेही कमकुवत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.
यापूर्वी लंडनच्या कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी करताना नीरव मोदीच्या भारत प्रत्यार्पणासंदर्भात सहमती दर्शविली होती आणि भारताच्या तुरुंगात त्याची काळजी घेण्यात येईल, असे सांगून त्याची विनंती नाकारली होती. या निर्णयाला नीरव मोदीने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने नीरव मोदी आणि त्याचे मामा मेहुल चोकसी यांनी 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही फसवणूक गॅरंटी पत्राद्वारे करण्यात आली. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाने भारतात बँक घोटाळा आणि मनी लॉन्ड्रिंगची दोन मोठी प्रकरणे नोंदविली आहेत. याशिवाय त्याच्यावर इतर काही गुन्हे भारतातही दाखल आहेत. सीबीआय आणि ईडीच्या विनंतीनुसार ऑगस्ट 2018 मध्ये त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी ब्रिटनला करण्यात आली होती.
या घोटाळ्यानंतर भारत पळून गेलेला नीरव मोदी सध्या लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहात बंद आहे. प्रत्यार्पण टाळण्यासाठी नीरव मोदीने कोर्टात सांगितले होते की, त्याला मानसिक आजार आहेत. भारताच्या तुरुंगात सुविधा नसल्याचा दावाही त्याने केला. मात्र, नीरव मोदीचे हे युक्तिवाद कोर्टाने फेटाळून लावले होते.
fugitive Nirav Modi appeal to England High Court to avoid Extradiction to India
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App