जाणून घ्या, कोणत्या कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीची सूत्र आहेत भारतीयांच्या हाती
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत दिवसेंदिवस प्रगतीचे शिखरे पादंक्रांत करत आहे. संपूर्ण जग आज भारताची वाटचाल कुतुहलाने पाहत आहे. नुकतंच भारताने चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करून समस्त जगाला आपली क्षमता दाखवून दिली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. From Google Microsoft to Starbucks, Moto Mobility Indians are managing many giant companies
भारतीय नागरिकही आपल्या कौशल्याने विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवताना दिसत आहे. आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात विविध महत्त्वपूर्ण ठिकाणी भारतीय माणूस पोहचला आहे. काही देशांच्या तर महत्त्वपूर्ण पदांवरही भारतीय व्यक्ती विराजमान झालेली आहे. अशाच प्रकारे जगभरात नावाजलेल्या अनेक दिग्गज कंपन्यांचा कारभारही आज भारतीय व्यक्ती सक्षमपणे पाहताना दिसत आहे.
याची काही उदाहरणे आपण पाहू शकता –
अल्फाबेट गुगलचे सीईओ सुंदर पिचई, मायक्रोसॉफ्टचे सीईओ – सत्या नडेला, यू ट्यूबचे सीईओ – निअल मोहन, Adobe चे सीईओ – शंतनु नारायण, जागतिक बँक समूहाचे सीईओ – अजयपाल सिंग बंगा, आयबीएमचे सीईओ – अरविंद कृष्णा, अल्बर्टसनचे सीईओ – विवेक शंकरन, NetApp चे सीईओ – जॉर्ज कुरियन, पालो अल्टो नेटवर्कचे सीईओ – निकेश अरोरा, अरिस्ता नेटवर्कच्या सीईओ – जयश्री उल्लाल, नोव्हार्टिसचे सीईओ – वसंत नरसिमहन, स्टारबक्सचे सीईओ – लक्ष्मण नरसिंहन, मायक्रोन टेक्नॉलॉजीचे सीईओ – संजय मेहरोत्रा, हनीवेलेच सीईओ – विमल कपूर, फेक्सच्या सीईओ – रेवती अद्वैती, वेफेअरचे सीईओ – नीरज शहा, Chanelच्या सीईओ – लीना नायर, मोटोरोला मोबिलिटीचे सीईओ – संजय झा, कॉग्निझंटचे सीईओ – रवी कुमार एस, Vimeoच्या सीईओ – अंजली सूद ही काही मोजकी नावं जरी असली तरी या व्यतिरक्तही अनेक नावं नक्कीच समोर येऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App