विशेष प्रतिनिधी
अमरावती : आजही बरेच लोक पीरियड्स ही एक नैसर्गिक गोष्ट आहे किंवा मुलींनी याबद्दल लाज बाळगली पाहिजे अशाप्रकारे पीरियड्स या गोष्टीला ट्रीट करताना दिसून येतात. नॉर्मल गप्पांच्या विषयांमध्ये पीरियड्स विषयाला आजही मानसिक मान्यता मिळालेली नाहीये. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मात्र एक अनोखा निर्णय घेतला आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील आंध्र प्रदेश सरकारने शासकीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी मुख्यमंत्री त्यांच्या कॅम्प मधील ऑफिसमधून “स्वेच्छा” ह्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत.
Free sanitary napkins to school, college-going girls! Jagan Mohan Reddy govt’s announcement
महिला आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि स्वच्छता लक्षात घेऊन हा कार्यक्रम सुरु केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत, राज्यभरातील सर्व सरकारी शाळा आणि इंटरमीडिएट कॉलेजमध्ये सातवी ते बारावी दरम्यान शिकणाऱ्या सुमारे 10 लाख किशोरवयीन मुलींना दरमहा दहा सॅनिटरी नॅपकिन्स दिले जातील.
मासिक पाळी दरम्यान मुलीं सॅनिटरी नॅपकिनच्या कमतरतेमुळे शाळेत अनुपस्थिती राहतात. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि शालेय मुलींच्या स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य देणे ह्या विचारातून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
जिसका कोई नही, उसका तो ‘जगन रेड्डी’ है यारो
दर दोन महिन्यांनी राज्यभरातील 10,000 पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलींना नॅपकिन देण्यात येतील. याशिवाय, सरकार, युनिसेफ, वॉश आणि पीअँडजी एकत्र येऊन मुलींना मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व समजून देण्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम राबवण्यात येणार आहेत.
पाणीपुरवठा आणि स्वच्छता सहयोगी परिषदेच्या मते, भारतातील जवळजवळ 23 टक्के मुली सॅनिटरी नॅपकिन्सचा अभाव, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग्य सुविधांचा अभाव, स्वच्छतागृहांमध्ये पाणी वाहण्यासारख्या मूलभूत सुविधांच्या अभावामुळे शाळा सोडून देतात. तर राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण नुसार 15-24 वर्षांच्या वयोगटातील फक्त 56 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिन वापरतात. हे प्रमाण एकूण संख्येच्या खूपच कमी आहे. 8 मार्च,२०२१ रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या कक्षेत ‘स्वेच्छा’ कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
सर्व YSR Cheyutha स्टोअर्समध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स योग्य दारात मिळणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App