सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या मागासावर्गीय अहवालावरून मराठा आरक्षण नाकारण्यात आहे. या अहवालातील चार हजार पानेच गायब झाली आहेत, असा आरोप भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.Four thousand pages missing in backward class commission report, BJP’s shocking allegation
विशेष प्रतिनिधी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या मागासावर्गीय अहवालावरून मराठा आरक्षण नाकारण्यात आहे. या अहवालातील चार हजार पानेच गायब झाली आहेत, असा आरोप भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केला आहे.
मराठा आरक्षण संदभार्तील मागास वर्गीय आयोगाने दिलेल्या अहवालातील तब्बल चार हजार पाने गायब आहेत. गायब झालेले 4 हजार पाने ही सुप्रीम कोर्टात दाखलच झाली नाहीत.
मराठा समाजाचा कोणी विश्वास घात केला ? असा सवाल केला. या सर्व प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणीसुद्धा लोणीकर यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. महाराष्ट्र सध्या शांत आहे.
सध्या कोरोना काळ सुरु आहे. फडणीसांचे जे कोणी सहकारी चिथावणी देत असतील त्या सहकाऱ्यांना शांततेचं आवाहन फडणवीसांनी करावं, असे चव्हाण म्हणाले.मागासवर्गीय अहवालाने दिलेल्या काही मुद्यांच्या आधारेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारले.
मात्र, त्यातील तब्बल चार हजार पानेच गायब झाल्याने न्यायालयासमोर पूर्ण अहवाल आलाच नाही. त्यामुळे आयोगाने दिलेले संदर्भ सर्वोच्च न्यायालयालासमोर आलेच नाही. त्याचा परिणाम आरक्षणाचा निर्णय रद्द करण्यात झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App