डीआरडीओच्या या औषधामुळे कोरोना अडीच दिवस अगोदर होतो बरा


देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच लस, औषधे, ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा वेळेस डीआरडीओने कोरोनावर बनविलेल्या नव्या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊन औषध महानियंत्रकांनी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे. या औषधामुळे कोरोना रुग्ण अडीच दिवस अगोदर बरे होता. ऑक्सिजनची त्यांची गरजही कमी होते.DRDO corona drug cures the corona two and a half days earlier


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच लस, औषधे, ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा वेळेस डीआरडीओने कोरोनावर बनविलेल्या नव्या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी देऊन औषध महानियंत्रकांनी सर्वांनाच मोठा दिलासा दिला आहे.

या औषधामुळे कोरोना रुग्ण अडीच दिवस अगोदर बरे होता. ऑक्सिजनची त्यांची गरजही कमी होते.२-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) असे नाव असलेल्या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात.त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते. (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या (डीआरडीओ) इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलायन्स (आयएनएमएएस) व हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्यूलर अँड

मॉलिक्यूलर बायोलॉजी (सीसीएमबी) या दोन संस्थांनी संशोधन करून कोरोनावरील नवे औषध बनविले आहे. हैदराबाद येथील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज या औषधाचे उत्पादन करणार आहे.

या औषधाच्या आजवर तीनवेळा मानवी चाचण्या झाल्याचे डीआरडीओने म्हटले आहे. देशभरात अकरा रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या.

ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली.

त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. ज्यांना हे औषध दिले नव्हते त्या रुग्णांपैकी फक्त ३१ टक्के रुग्णांनाच बाहेरून दिलेल्या ऑक्सिजनची गरज उरली नाही.

डीआरडीओच्या २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) या नव्या औषधाने ज्यांची प्रकृतीत मोठी सुधारणा झाली, त्यामध्ये ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची लक्षणीय संख्या आहे.

डीआरडीओचे २-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) हे कोरोनावरील नवे औषध पावडर स्वरुपात असून रुग्णाने ते पाण्यात मिसळून घ्यायचे आहे.कोरोनामुळे कोणत्या पेशी बाधित झाल्या आहेत याची ओळख हे औषध पटविते व त्या पेशींचे कार्य सुधारते.

रुग्णाच्या प्रतिकारशक्तीत वाढ करून विषाणूला रोखण्याचे काम करते. देशात रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना हे गुणकारी औषध त्यांच्यासाठी वरदान ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

DRDO corona drug cures the corona two and a half days earlier

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात