कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी


कोरोनाविरोधातील लढाईसाठी ऑक्सिजन कमी पडत असल्याने वाहतुकीसाठी अदानी ग्रुपकडून ४८ क्रायोजेनिक टॅँकर खरेदी केले आहेत. ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.Adani Group contributes to fight against corona, purchase of 48 cryogenic tankers for oxygen transport


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाविरोधातील लढाईसाठी ऑक्सिजन कमी पडत असल्याने वाहतुकीसाठी अदानी ग्रुपकडून ४८ क्रायोजेनिक टॅँकर खरेदी केले आहेत. ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.

अदानी ग्रुपने कोरोनाला रोखण्यासाठी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. ज्यामध्ये या समुहातील कर्मचारी व लॉजिस्टिक्सपासून बंदर व विमानतळांचा देखील समावेश आहे.अदानी ग्रुपकडून दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मेडिकल ऑक्सिजन आणि वाहतुकीसाठी योग्य अशा क्रायोजेनिक कंटेनरबरोबरच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी देखील योगदान दिले आहे.

अदानी समुहाने ७८० टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यास सक्षम असलेल्या ४८ क्रायोजेनिक टँकची खरेदी केली आहे.अदानी ग्रुपने आपल्या परदेशातील संपकार्चा लाभ घेणं सुरू केलं.

जेणेकरून मेडिकल ऑक्सिजन आणि वाहतुकीस योग्य क्रायोजेनिक कंटेनर सारख्या महत्वपूर्ण व आवश्यक वस्तुंचा पुरवठा सुनिश्चित केला जाऊ शकेल.

सौदी अरब, थायलंड, सिंगापूर, ताइवान आणि यूएई सारख्या देशांमध्ये प्रमुख निर्मात्यांकडून अदानी ग्रुपने ४८ क्रायोजेनिक टँक खरेदी केले आहेत.

यातील काही मोठ्या क्रायोजेनिक टँकना गुजरातमधील मुंद्रा बंदराच्या माध्यमातून पाठवले गेले, तर उर्वरीत भारतीय वायु दलाच्या मदतीने देशात आणले गेले आहेत.

Adani Group contributes to fight against corona, purchase of 48 cryogenic tankers for oxygen transport

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात