विशेष प्रतिनिधी
जम्मू, – सुरक्षा दलांनी जैशे मोहंमद या संघटनेचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे. आयईडी स्फोटके ठेवलेल्या वाहनाचा स्फोट घडवून आणत राज्यात तणाव निर्माण करण्याचे या दहशतवाद्यांचे कारस्थान होते. याप्रकरणी चार दहशतवाद्यांसह त्यांच्या अन्य सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.Four terrorist arrested in Jammu and Kashmir
काश्मीशर खोऱ्याप्रमाणेच अयोध्येतील राममंदिर, पानिपत येथील तेल शुद्धीकरण कारखान्यात घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. जम्मूत अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमधील एकजण हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. काश्मीतर खोऱ्यामध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना पाकमधून ड्रोन्सद्वारे शस्त्रपुरवठा करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे.
किश्त्वाड जिल्ह्यात देखील सुरक्षा दलांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणावर स्फोटके निकामी केली आहेत.या कारवाईत सर्वप्रथम मुंताझीर मन्सूर ऊर्फ सैफुल्लाह याला सुरक्षा दलांनी अटक केली होती. पाठोपाठ जैशच्या आणखी तीन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली असून त्यात इजहार खान ऊर्फ सोनू खानचा समावेश असून तो उत्तरप्रदेशातील शामली जिल्ह्यातील रहिवासी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App